Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1992 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच

1992 विश्व कपचे मॅन ऑफ द मॅच
, गुरूवार, 22 जानेवारी 2015 (16:24 IST)
1992 : वसीम आक्रम (पाकिस्तान, 33 धावा, 49 धावा देऊन 3 विकेट)- स्विंग गोलंदाजीचा सुलतान असणारा पाकिस्तानचा ऑलराउंडर वसीम अक्रमने 1992च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दुहेरी प्रदर्शन केले आणि 'मॅन ऑफ द मॅच' बनण्याचा सन्मान त्याला मिळाला.  वसीमने 33 धावा काढल्या त्याशिवाय 49 धावा देऊन 3 विकेट घेतले, ज्यामुळे पाकिस्तान चॅम्पियन बनला.  

3 जून 1966मध्ये जन्म घेणार्‍या वसीम अक्रम यांचा पद किती मोठा होता, याचा अंदाजा आम्ही येथूनच लावू शकतो की विस्डन क्रिकेटच्या 150व्या वर्षगांठीत वसीम यांना ऑल टाइम वर्ल्ड इलेव्हनच्या टेस्ट संघात जागा मिळाली. क्रिकेट इतिहासात सर्वश्रेष्ठ जलदगतीचा गोलंदाज म्हणून अकरम यांचे नाव आहे. 2002मध्ये विस्डनने त्यांना वनडेचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज घोषित केले, जेव्हाकी 2003च्या वर्ल्ड कपमध्ये जगातील पहिले असे जलद गतीचे गोलंदाज बनले ज्यांनी 500 विकेट घेतले.  

वसीम अक्रम यांनी 104 टेस्ट सामन्यात 2898 धावा (उच्चतम नाबाद 257) आणि 356 वनडे सामन्यात 3717 धावा (उच्चतम 86) काढल्या. त्यांनी टेस्ट सामन्यात 414 आणि वनडेमध्ये ऐकूण 502 विकेट घेतले. अक्रम यांनी 9 जानेवारी 2002ला टेस्ट मॅच आणि  1 मार्च 2003मध्ये वनडेहून संन्यास घेतला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi