Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2011 विश्वकपचा मॅन ऑफ द मॅच

2011 विश्वकपचा मॅन ऑफ द मॅच
, गुरूवार, 22 जानेवारी 2015 (16:44 IST)
2011 : महेंद्र सिंह धोनी (नाबाद 91 रन) महेंद्र सिंह धोनीने 2011च्या वर्ल्डकपमध्ये मुंबईत खेळण्यात आलेल्या फायनलमध्ये श्रीलंकाविरुद्ध 79 चेंडूत नाबाद 91 धावा काढल्या होत्या आणि भारताला 28 वर्षांनंतर वर्ल्ड कप चॅम्पियन बनवले होते. या डावामुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला.   
 
7 जुलै 1981मध्ये जन्म घेणार्‍या धोनीने भारतीय क्रिकेटचाहत्यांना बर्‍याचवेळा उत्साहा साजरा करण्याचे मोके दिले. तो क्रिकेटच्या तिन्ही  प्रारूप टी20, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार बनला. 2007मध्ये राहुल द्रविडाकडून त्याने टीम इंडियाची कप्तानी घेतली आणि 2007 मध्ये भारताला आयसीसी टी20 वर्ल्डकपचा चॅम्पियन बनवले. हेच नाही तर धोनीच्या यशस्वी कप्तानीमुळे भारताने 2007-2008मध्ये सीबी सीरीज, 2010मध्ये आशिया कप, 2011मध्ये आयसीसी वर्ल्डकप आणि 2013मध्ये आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफी देखील जिंकली. धोनीला 2008 आणि 2009मध्ये लागोपाठ दोनवेळा 'आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर' घोषित करण्यात आले. 2007मध्ये त्यांनी 'राजीव गांधी खेलरत्न'चा पुरस्कार देण्यात आला आणि 2009मध्ये 'पद्मश्री'हून सन्मानित करण्यात आले. 

धोनीचे वनडे पदार्पण 23 डिसेंबर 2004मध्ये बांगलादेशाविरुद्ध झाले, आणि त्याने टेस्ट कॅप 2 डिसेंबर 2005मध्ये श्रीलंकेच्याविरुद्ध घातली. धोनीने 90 टेस्ट मॅचमध्ये 4876 धावा काढल्या, ज्यात 6 शतक आणि 33 अर्धशतक सामील आहे. टेस्ट मध्ये त्याचा उच्चतम स्कोर 224 धावा आहेत. धोनीने 250 वनडे सामने खेळून 8192 धावा काढल्या, ज्यात 9 शतक आणि 56 अर्धशतक सामील आहे. वनडेमध्ये त्याचा टॉप स्कोर नाबाद 183 धावा राहिल्या. विकेटकीपरम्हणून त्याने टेस्टमध्ये 256 आणि वनडेमध्ये 227 झेल घेतले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi