Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगळग्रह मंदिर परिसरात ४ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

Mangal Graha Mandir Amalner
* पैसा, संपत्ती, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे कार्य- खा. उन्मेष पाटील
* ४ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
* स्वमालकीचे हेलिपॅड असलेले राज्यातील एकमेव मंदिर
 
अमळनेर -  पैसा, संपत्ती, राजकारण यांच्या पलीकडे जाऊन मंगळग्रह सेवा संस्था काम करीत आहे. यामुळेच मंगळ ग्रह मंदिराचे आज देशभरात नावलौकिक झाले असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्थेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
 
शासनाच्या पर्यटन विभागातर्फे मंगळग्रह सेवा संस्थेला विविध विकास कामांसाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातूनच ६ मे रोजी मंदिर परिसरातील जागेत हेलिपॅड, कार पार्किंग, सोलर सिस्टिम, कॅफेटेरियाच्या जागेचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खासदार पाटील पुढे म्हणाले की, खानदेशचा सुपुत्र म्हणून भूमिपूजनाचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे. संस्थेने प्रकल्पाच्या विकासासाठी पावित्र्य जपत तसेच सामाजिक जाणीव ठेवून प्रवास सुरू ठेवला आहे.  तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होत आहे. येणाऱ्या काळातील पुढील अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील. 
 
आमदार अनिल भाईदास पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, संस्थेला मंजूर झालेल्या २५ कोटींपैकी लवकरच उर्वरित २० कोटी रुपयेही आणून मंदिर परिसरात भरीव विकासकामे करू. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व स्मिता वाघ, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी जि.प. सदस्य ॲड. व्ही.आर. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राकेश पाटील, प्रफुल्ल पाटील, विक्रांत पाटील, एस. बी.बैसाने, नरेश कांबळे, ललित सौंडागर, जयवंत पाटील, डॉ. अविनाश जोशी, विक्रांत पाटील, मोहन सातपुते, प्रवीण जैन, पंकज मुंदडे, सुंदर पट्टीचे सुरेश पाटील, ॲड. प्रदीप कुलकर्णी, राजेंद्र निकुंभ, भागवत पाटील, डॉ. विजय पवार, प्रशांत सिंघवी, नरेंद्र निकुंभ, मनीष जोशी, अनिल रायसोनी, मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त जयश्री साबे सेवेकरी उज्वला शाह, आर. टी.पाटील, आशिष चौधरी, व्ही.व्ही.कुलकर्णी, पी. एल. मेखा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 
 
मंदिरातील पुजारी प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, तुषार दिक्षित, मेहुल कुलकर्णी, यतीन जोशी यांनी पोराहित्य केले. संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले.       
 
श्री मंगळ ग्रह मंदिर अनेक बाबतीत एकमेवाद्वितीय आहे. त्यात आणखी एका बाबीची भर पडली आहे. ती म्हणजे स्वतःच्या मालकीचे हेलिपॅड असलेले हे आता राज्यातील एकमेव मंदिर ठरले आहे. तसेच अत्यंत देखण्या असलेल्या कार पार्किंगच्या छतावर सोलर पॅनल असलेलेही हे एकमेव मंदिर ठरले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sankashti Chaturthi 2023: मेहनत करूनही यश मिळत नसतेल तर संकष्टी चतुर्थीला हा उपाय करा