Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर आपली रास Mesh आहे तर आपल्यावर असेल मंगळदेवाची कृपा, फक्त येथे जाऊन या 3 वस्तू अर्पित करा

जर आपली रास Mesh आहे तर आपल्यावर असेल मंगळदेवाची कृपा, फक्त येथे जाऊन या 3 वस्तू अर्पित करा
, सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (16:59 IST)
Aries zodiac sign astrology: मेष आणि वृश्‍चिक राशींचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि देव मंगळ देव आणि हनुमान आहेत. तर जर आपली रास मेष असेल तर आपल्यावर मंगळ देवाची विशेष कृपा राहील कारण मेषचे स्थान मस्तकात असतं आणि ही अग्नी घटक प्रधान रास आहे. अशात आपल्याला महाराष्ट्रातील जळगाव जवळीक अमळनेर स्थित मंगळ ग्रह मंदिरात जाऊन मंगळ देवाचे दर्शन घेतले पाहिजे कारण हे अत्यंत जागृत मंदिर आहे.
 
मेष रास याचे कारक ग्रह मंगळ, सूर्य आणि गुरु मानले गेले आहे. अग्नी तत्व प्रधान मेष राशीचे स्वामी मंगळ आहे आणि या राशीचे पूर्व दिशेवर स्वामित्व आहे. भाग चर आहे आणि मेष लग्नाची बाधक रास कुंभ आणि बाधक ग्रह शनी आहे म्हणून आपल्याला मंगळ देवाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. मंगळ देव ग्रह मंदिरात मंगळ दोष शांती साठी पूजा आणि अभिषेक केला जातो. तसेच लाल किताब ज्योतिष मेष रास या बद्दल काय सांगत हे देखील जाणून घ्या-
 
अक्षर तालिका : अ, चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो।
राशि वैशिष्ट्ये  : नेतृत्व, बुद्धी, पराक्रम आणि बळ ।
 
लाल किताब प्रमाणे पहिल्या भावात अर्थात घरात मेष रास मानले जाते. मेषच्या मंगळाचं पक्कं घर तिसरं आणि आठवं मानले गेले आहे. लाल किताब प्रमाणे मंगळ चांगला आणि वाईट दोन्ही असतो. कुंडलीप्रमाणे मंगळ चांगला किंवा वाईट होण्याच्या काही परिस्थिती आहेत. जर आपण मेष राशीचे जातक असाल तर आपल्याला काही सल्ला दिला जात आहे-
 
मंगळ वाईट : याचा अर्थ अशुभ. मंगळ अशुभ होण्यामागील कारणं - मास भक्षण करणे, भावंडांशी भांडणं करणे आणि क्रोध करणे. दुसरं जर कुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश भावात मंगळ असेल तर इतर ज्योतिष विद्या प्रमाणे मांगलिक दोष मानला जातो, परंतु येथे मंगळाचा संबंध रक्ताशी आहे. रक्त किंवा स्वभाव वाईट असेल तर मंगळ अशुभ असल्याचे समजावे.
 
या व्यतिरिक्त मेष राशीच्या जातकांचा मंगळ वाईट असेल तर मंगळ संबंधी आजार जसे पोटातील आजार, कॉलरा, पित्त, फिस्टुला, फोड, कॅन्कर आणि पोटाशी संबंधित समस्या सुरू होतात. मानसिक आजारांमध्ये अती क्रोध, वेडापणा, चिडचिड, तणाव, निद्रानाश इ.
 
केवळ या 3 वस्तू अर्पित कराव्यात : जर आपलं मंगळ वाईट असेल तर आपल्याला मंगळ दोष शांतीसाठी अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर जाणे गरजेचे आहे. येथे दर्शन केल्याने शांती मिळते. येथे गूळ, मसूर डाळ आणि खडीसाखर अर्पित केल्याने मंगळ देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
 
खबरदारी आणि उपाय : कोणाकडूनही काहीही मोफत घेतले तर भरभराटी नाहीशी होते. वडील आणि भावाशी वाद घालू नये. आपल्या मुलांच्या वाढदिवसाला नमकीन पदार्थांचे वाटप करा. पाहुण्यांना मिठाई खाऊ घाला. विधवा स्त्रियांची निस्वार्थ मदत करा. नेहमी मोठ्यांचा आदर राखा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करत राहा. कधी-कधी गुलाबी किंवा लाल रंगाच्या चादरीवर झोपा. आतड्या आणि दात स्वच्छ ठेवा.
 
हनुमानाची भक्ती करा. तसेच मंगळ वाईट असल्यास डोळ्यात पांढर्‍या रंगाचा सूरमा लावा. गूळाचे सेवन करा आणि भावाशी तसेच मित्रांशी चांगले संबंध ठेवा. क्रोध करणे टाळा आणि मंगळ शांती साठी अमळनेर स्थित मंगळ देव मंदिरात जाऊन अभिषेक किंवा हवन करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gajanan Maharaj Prakatdin 2023 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती