Mangal Grah Mandir Amalner महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर येथे स्थित मंगळ ग्रह या प्राचीन मंदिरात मंगळ दोष शांतीसाठी भोमयाज्ञ अभिषेक, पंचामृत अभिषेक, नित्य प्रभाव श्री मंगळ अभिषेक, स्वतंत्र अभिषेक, समूह अभिषेक आणि हवनात्मक अभिषेक केला जातो.
ज्योतिष मान्यतेनुसार मांगलिक कुंडलीत मंगळ दोषाचे तीन प्रकार आहेत- सौम्य मंगळ, मध्यम मंगळ आणि कडक मंगळ. वेगवेगळ्या प्रकाराच्या मंगळ दोषासाठी वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. जपात्मक, अभिषेकात्मक आणि हवनात्मक. जीवनात मंगळ व्हावे म्हणून मंगळ अभिषेक नक्की करवावे मग आपल्या मंगळ दोष असो किंवा नसो.
तसेच सौम्य मंगळ असल्यास आपण सामूहिक अभिषेक देखील करवू शकता. मध्यम मंगळ असल्यास पंचामृत किंवा स्वतंत्र अभिषेक करवू शकता आणि कडक मंगळ असल्यास हवनात्मक अभिषेक करवू शकता.
अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात विद्वान पंडितांच्या समूहाद्वारे पूजा, अभिषेक आणि हवन याचे आयोजन केले जातात.
जर आपल्यालाही मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक करवण्याची इच्छा असेल तर आपण येथील काउंटरहून रसीद कापवू शकता. आपण ऑनलाइन बुकिंग देखील करवू शकता. यासाठी आपल्याला
www.mangalgrahamandir.com या संकेतस्थळावर भेट देऊन अभिषेक बुकिंग फॉर्म भरावा लागेल. त्याची रसीद देखील लगेच मिळेल. या रसीदचा स्क्रीन शॉट आपण जतन करुन मंदिरात मोबाइलवर बुकिंग दाखवून अभिषेकासाठी बसू शकता.