Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एट्रोसिटी प्रकार सामाजिक प्रश्न: प्रवीण गायकवाड

एट्रोसिटी प्रकार सामाजिक प्रश्न: प्रवीण गायकवाड
अनेक मराठा नेते सत्तेत असूही मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. म्हणूनच आता हा समाज मूक मोर्च्याद्वारे आपल्या मागण्या ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडे पुण्यात झालेल्या या मोर्च्यात 10 लाखाहून अधिक लोकं सामील झाले होते. आतापर्यंत 16 मूक मार्च निघाले. संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि मर्डर यापासून सुरू झालेल्या आंदोलनात इतर अनेक समस्या व मुद्दे पुढे येत आहेत.
 
मराठा समाजातील शेतकर्‍यांचा समस्या, आत्महत्या, शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील लोकांची परिस्थितीत तसेच त्यांना नोकरी, व्यवसाय- उद्योगात होत असणार त्रास हे सर्व मुद्दे सुटावे. सर्वात मोठी समस्या म्हणजे एट्रोसिटी, या कायद्याचा शिक्षण संस्थांमध्ये गैरवापर होतो. आतापर्यंत देशात एक लाख 86 हजार सातशे सहा प्रकरणे घडली. त्यातील एक लाख 19 हजार 526 खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यातील सात हजार 345 खटले महाराष्ट्रातील आहेत. यात केवळ 69 जणांना शिक्षा झाली इतर प्रकरणे पॅडिंग आहे.
 
एट्रोसिटीच्या प्रकाराला सामाजिक प्रश्न म्हणून बघितले गेले पाहिजे. आतापर्यंत मराठा समाज दुर्लक्षित राहिला असून आमचे निवेदन आहे की सरकारने आमच्या मागण्यांचा अभ्यास करून योजनांचा आराखडा तयार करावा आणि चर्चा करावी.
 
मराठा समाजाला आरक्षण, शेतकर्‍यांना उत्पादनावर आधारित योग्य भाव मिळावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक, खासगी शिक्षण संस्था या समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माता भगिनींचा अवमान करणार्‍या शिवसेनेने माफी मागावीः अशोक