ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं सांगितलं. या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे हे देखील होते.
निवडणुका जाहीर झाल्या आहेत. परंतु काही प्रमाणात मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. ५० टक्क्याच्यावर जाता येत नाही. त्यामुळे मार्ग कसा काढता येईल त्या संदर्भात उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवू, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यात अनेक पर्यायांवर चर्चा झाली. हे सगळे पर्याय मंत्रिमंडळासमोर मांडून त्यानंतर निर्णय घेऊ. सर्व पक्षांनी जर ओबीसी उमेदवार दिला तर ओबीसी समाजासाठी आनंदी आहे. सर्व पक्ष ओबीसींसाठी संवेदनशील आहेत, असं सर्वांना वाटेल.