Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
, सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (19:29 IST)
राज्यात आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक झाला आहे. आमदार आणि धनगर समाजाचे नेते यांनी आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ आहे असा इशाराच दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे.
 
ते म्हणाले की, “धनगर समाजाची ही जुनी मागणी असून नव्याने मागणी करण्यात आलेली नाही. धनगर समाज गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करत असून रस्त्यावर उतरतोय, जेलमध्ये जातोय. पण तरीही आमची मागणी काही पूर्ण झालेली नाही. आमच्या मुलांच्या हातात एसटीचा दाखला द्या हीच आमची सरकारकडे मागणी आहे. ते कसं करायचं यासाठी विधी तज्ञांशी चर्चा करा आणि आमचा मार्ग मोकळा करा. पण सरकार यावर कोणतीही चर्चा करताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे”.
 
कोरोनामुळे मला अधिवेशनात जाता आलं नाही. दुर्दैवाने तिथे हा प्रश्न मांडू शकलो नाही. तिथंही मी आंदोलनाची तयारी केली होती,” सरकारने चर्चा करुन काही दिवसांत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत आहेत : फडणवीस