Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल

मराठा आरक्षण : राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल
, मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (08:47 IST)
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 
 
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
 
“आपण आज एक टप्पा पुढे गेलो आहोत. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत” असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. “मराठा आरक्षणावर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे. तसंच यावर लवकरात लवकर घटनापीठ स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करतो आहोत”, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेन्नईच्या टीमसाठी एक चांगली बातमी, रुतुराज गायकवाड संघात दाखल