मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण केले होते. या साठी त्यांनी अंतरवली सराटी येथून आंदोलन केले होते. त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलं असून राज्य सरकारने त्यांच्या मागण्याला पूर्ण केल्या आहे. राज्य सरकार कडून मध्यरात्री अध्यादेश काढण्यात आला असून त्याची प्रत मनोज जरांगे यांना दिली आहे. या अध्यादेशात सग्यासोयरानां देखील प्रमाणपत्र दिले जाण्याचा मुद्दा सम्मिलीत आहे.
या वरून राष्ट्रवादीचे अजितपवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी दाखवली असून त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. भूजबळ यांनी या विरोध प्रदर्शन म्हणून 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मनोज जरांगे यांनी छगन भूजबळांना सडेतोड उत्तर दिले आहे.
या मेळाव्याचे काहीच होणार नसून मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. मराठ्यांनी कसलीही काळजी करण्याची गरज नाही. सरकार ने अधिसूचना काढली असून यावर 15 दिवसांत लोकांच म्हणणं मागवलं आहे. सगेसोयरे हा शब्द फायनल झाला असून या मध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे. काळजी करण्याची कारण नाही.
समाजासाठी काहीही अडचणी आल्यास मी उभा आहे. मराठे जिंकून आले आहे. गोर गरिबांसाठी सगेसोयरे कायदा झाला अशे काही जण आहे ज्यांना विचारलं नसेल म्हणून दुःख होत असेल. एखाद्याच चांगलं होत असताना अन्नात माती कालवयाची.त्या कायद्याला काहीही होणार नाही. असे जरांगे म्हणाले.