Publish Date: Wed, 14 Dec 2016 (14:22 IST)
Updated Date: Wed, 14 Dec 2016 (14:25 IST)
नागपूरमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मराठा मूक मोर्चा निघाला आहे. यशवंत स्टेडियमपासून निघालेला मोर्चा मॉरिस कॉलेज टी पाईंटजवळ संपणार आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस आमदार मराठा मोर्चात सहभागी झाले आहेत. तर शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून मोर्चात सहभागी होत आहेत. सोबतच शेतकरी आत्महत्या पिडीतांची मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत.