मराठा आरक्षण: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सरकारला दिलेल्या मुदतीत त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावे अन्यथा पुन्हा आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. तसेच विदर्भातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले. मग आम्हीच काय केले. आम्हाला गायकवाड आयोगाने मागास असल्याचे सिद्ध केले आहे. जर पुरावे सापडले नाहीत तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारकडून आतापर्यत जी माहिती मिळाली, त्याचा आढावा समाजापुढे मांडण्यासाठी आणि समाजाला शांततेचे आवाहन करण्यासाठी 30 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबरपर्यत दौरा करणार आहे. या दौ-याची सुरुवात 30 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीपासून होणार आहे. सुरवातीला जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यांतील विविध गावांत दौरा करणार आहे. त्यानंतर धाराशिव, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील विविध गावात दौरा केला जाणार आहे. तसेच 11 ऑक्टोबरला अंतरवली सराटीला या दौ-याची सांगता होईल. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेतली जाणार आहे. या सभेत सरकारला ताकद दाखवून दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Edited By - Ratnadeep ranshoor