Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोज जरांगेकडून उपोषणाची नवी तारिख जाहिर

manoj jarange
, मंगळवार, 4 जून 2024 (15:44 IST)
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी चार जूनला आम्ही उपोषणाला बसू असे सांगितले होते. पण त्यांनी आपल्या उपोषणाची तारीख मनोज जरांगे पाटील यांनी बदलेली आहे. 
 
लोकसभा निवडणूक 2024 परिणाम आज स्पष्ट होणार आहे. तसेच आता अवघे काही तास राहिले आहे. या परिणामांकडे देशातील प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 4 जून रोजी उपोषणाला बसू असे सांगितले होते. पण आता जरांगे पाटलांनी ही तारीख बदलली आहे. कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न तसेच निवडणुकीचे परिणाम पाहता जरांगे पाटलांनी हा निर्णय घेतला असे समजले आहे. 
 
संपूर्ण देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीचा परिणामाकडे लागलेलं असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 4 जून रोजी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. अंतरवाली सराटी येथील काही नागरिकांनी उपोषण आंदोलनाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत म्हंटले की, या आंदोलनामुळे गावातील जातीय तडजोड बिघडत आहे. तसेच आपलं उपोषण तात्पुरत स्थगित करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. 
 
अंतरवाली सराटीच्या नागरिकांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला असून मनोज जरांगे पाटील हे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी उपोषण करणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 8 जून रोजी आपण उपोषणाला बसणार आहोत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारामतीचा निकाल यापेक्षा वेगळा लागेल असं कधी वाटलं नव्हतं- शरद पवार