Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
, गुरूवार, 21 जानेवारी 2021 (09:01 IST)
मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात ही घटना घडली आहे. या तरुणाने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादेतील क्रांती चौकात फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दत्ता भोकरे असं विष प्राशन केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने विषारी औषध प्राशन केले आहे.
 
“औरंगाबाद(संभाजीनगर) येथील माझा तरुण सहकारी दत्ता भोकरे यांनी आरक्षणाच्या नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने उचललेलं पाऊल अतिशय दुर्दैवी आहे, सुदैवाने त्याला वाचवण्यात यश मिळाले. दत्ताची सद्य परिस्थिती प्रकृती चांगली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत,” अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली.
 
“माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, कोणत्याही युवकांनी असे पाऊल उचलू नये. आरक्षण आपल्या हक्काचं आहे, न्यायालयात आपल्याला आरक्षण मिळेलच ही खात्री आहे. आपला एक एक जीव हा महत्त्वाचा आहे. हात जोडून विनंती करतो, संयम ठेवा आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपण जिंकूच!,” असेही विनोद पाटील म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण