Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षण प्रकरणाची पुढची सुनावणी 5 फेब्रुवारीला

मराठा आरक्षण प्रकरणाची पुढची सुनावणी 5 फेब्रुवारीला
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:10 IST)
मराठा आरक्षण प्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु होणार होती. मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 5 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, ही सुनावणी 25 जानेवारीला सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होते. मात्र आजपासूनच सुनावणी घेण्याचे ठरले. मात्र, आजचीही सुनावणी आता पुढे ढकलली आहे. राज्य सरकारने 11 न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. 
 
मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने याआधीच्या सुनावणीवेळी नकार दिला होता. स्थगिती पूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला देखील न्यायालयाने परवानगी दिलेली नाही. याआधीही काही राज्यांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याचा युक्तीवाद महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला होता. मात्र, आरक्षणाच्या अनुषंगाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही : फडणवीस