मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली आहे.शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद आहे.
मात्र, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी या मसुद्यावर नाराजी व्यक्त केली.
मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “आम्हाला सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. आमच्यावर हे आरक्षण थोपवताय का? ओबीसीतून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण पाहिजे, ही आमची मागणी आहे. गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशन घ्यायला हवं.”हे आरक्षण आम्हाला मान्य नाही. अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
ज्यांच्या नोंदीच नाही सापडल्या, त्यांचं आरक्षण आमच्यावर थोपवताय का? तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवणार असाल तर ते चालणार नाही. नाहीतर उद्या आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आम्हाला सगेसोयऱ्यांचीच अंमलबजावणी हवी आहे,” असं मनोज जरांगेंनी म्हटलं.
जरांगे पुढे म्हणाले, “कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळावं, त्याची अंमलबजावणी हवी. दोघातिघांना 10% आरक्षण हवं, त्यांचीच ती मागणी आहे. पण बहुसंख्य मराठ्यांच्या पोरांचं यात भलं होणार नाही. आम्हाला ते नको आहे. 50% च्या वरती आरक्षण टिकत नाही, हे आम्हाला कळतंय.”उद्या मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाची बैठक बोलावली आहे. या बैठकीतून पुढ्च्या आंदोलनाची दिशा ठरवू. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो.
आमचा हक्क आम्हाला द्या .आम्हाला आरक्षण द्या. सगे सोयरेंची अंमलबजावणी करा. आम्ही आमच्या आरक्षणावर ठाम आहोत. सरकार ने योग्य निर्णय द्यायला पाहिजे होता. उद्या दुपारी 12 वाजता अंतरवली येथे बैठक होणार आहे उद्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं. असं मनोज जरांगे म्हणाले.