Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे असणार आहे आंदोलन, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती

असे असणार आहे आंदोलन, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
, गुरूवार, 10 जून 2021 (16:08 IST)
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहोतच परंतु ते मुक आंदोलन आहे. त्यादिवशी मी काहीही बोलणार नाही कोणीही बोलणार नाही परंतु एक वाक्य जरुर असेल ते म्हणजे “समाज बोललंय, आम्ही बोललोय आता तुम्ही प्रतिनिधींनी बोलावं लागतंय” या आंदोलनात शाहु महाराजांचा पुतळा मध्ये असेल एका बाजूला सगळे समन्वय असणार त्याच्यासोबत मी असणार, मागच्या बाजूला राज्याचे समन्वयक बसणार त्याच्या मागे ज्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे त्यांना बसवणार, सारथीचे मुलांना बोलवणार, उजवीकडे आमदार, खासदार आणि मंत्री असणार आहेत. त्या दिवशी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी बोलायचे आहे असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
 
आमदार, खासदरांनी फक्त बोलायचे नाही तर जबाबदारी काय घेणार हे सांगायचे आहे. ते जे काही बोलतील तेच त्यांना विधानभवनात अधिवेशनादरम्यान बोलावे लागणार आहे. असे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले आहे. या सरकारने कधीही दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा असे राजेंनी म्हटले आहे. तो पहिला जोर लॉंग मार्च असेल आणि पुण्यापासून ते मंत्रालयापर्यंत असणार आहे. ही परिस्थिती आणू नका असेही राजेंनी म्हटले आहे. ३६ जिल्ह्यांचे मुक आंदोलन पहिले कोल्हापुरमधून सुरु होणार आहे. आमदार खासदारांनी बोलायचे आहे. पहिले पाच स्थळ कोल्हापुर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर आणि रायगड असे ५ विभाग आहे. पुढची दिशा समन्वयक ठरवतील. या आंदोलनानंतर लॉंग मार्चची प्लॅनिंग करणार असल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टिकणार : शरद पवार