Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maratha Reservation :मराठा आरक्षणासाठी दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
, रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (13:03 IST)
सध्या मराठा आरक्षण मिळावं या साठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सगे सोयरे अध्यादेश लागू व्हावे या साठी मनोज जरांगे हे जालनाच्या आंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे. जालना आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. पहिली घटना जालन्यातील तालुका आंबाडच्या चिकनगावात घडली आहे.

येथे संदीपान आनंदराव चौधरी वय वर्षे 41 यांनी लोणारच्या भायगाव शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर त्यांनी लिहिलेल्या चिट्ठीत मनोज जरांगे यांची तब्बेत बरी नाही. शासन या कडे लक्ष देत नाही. आरक्षणावर अद्याप कुठला ही निर्णय घेत नाही. मी आपले जीवन संपवीत आहे शासनाने मराठा आरक्षणावर निर्णय द्यावे. असे लिहिले आहे. संदीपान यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. 

तर दुसरी घटना छत्रपती संभाजी नगर येथे घडली आहे. येथे फुलंब्री तालुक्यात गणोरी येथील गजानन नारायण जाधव वय वर्ष 18 या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. गजानन हा निधोना येथे प्रभात हायस्कुल विद्यालयात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. या तरुणाने एकच 'मिशन मराठा आरक्षण' मराठा आरक्षण मिळत नसल्याने मी ही टोकाची भूमिका घेत आहे. असे चिट्ठीत लिहून गळफास घेतला आहे. 

Edited By- Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताच्या मुलींनी इतिहास रचला, उपांत्य फेरी गाठली