Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही : जरांगे

manoj jarange
, मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (08:08 IST)
लोहारा : सर्वच राजकीय पक्षांत मराठा समाजांचे गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत लोकप्रतिनिधी आहेत. पण मराठा समाजासाठी काहीच केले नाही याची खंत व्यक्त करत जो पर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि सरकारलाही बसु देणार नाही असा सज्जड इशारा मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. लोहारा तालुक्यातील माकणी येथे आयोजित सभेत मनोज जरांगे-पाटील बोलत होते.
 
माकणी, करंजगाव येथील सभेच्या ठिकाणी मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता. सभे पुर्वी पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यासभेला मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील उभे राहिले असता त्यांची प्रकृती अस्वास्थ वाटुन लागल्याने उभे न राहता खाली बसून भाषण करत अनेक मुद्यांला हात घालत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अन् सरकारला बसु देणार देखील नाही. तरी पण आपण धिर सोडू नका. सरकार आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी चालढकल करीत असुन आरक्षण व कुणबी प्रमाणपत्रा संदर्भात लवकरच पुढील दिशा ठरविण्यात येईल. असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आ. दुर्राणी, आ. मुटकुळे यांचे संचालकत्व रद्द