जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमधील अंतर्गत राजकारण तसेच समाजातील एका घटकामुळे अॅट्रासिटीचा गैरवापर होण्यास सुरूवात झाली आहे. दोन समाजात जर फुट पडली तर समाजाचा विकास कसा होणार? असा प्रश्न उपस्थित करत त्र्यंबक असो वा कोपर्डी प्रकरण कुठल्याच गुन्हेगाराचे समर्थन करता येत नाही. हा सर्व प्रकार निषेध असून नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले तर अॅट्रासिटीत बदल शक्य मात्र रद्द होणार नाही असे मत समाज कल्याण मंत्री खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकाराशी बोलत होते.
यावेळी बोलतांना आठवले म्हणाले, तळेगांव येथील चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. मात्र अत्याचार आणि तसा प्रयत्न हा सारखाच असून त्याचे समर्थन कदापीही करता येणार नाही. कोपर्डी प्रकरणानंतरही समाजात शांतता होती मात्र लगेच त्र्यंबक प्रकरणानंतर दोन समाज घटकांमध्ये संघर्ष पेटला आणि टोकास गेला होता. नाशिक जिल्हा हा दोन्ही समाज घटकांना एकत्र बांधून ठेवणारा जिल्हा आहे. येथे अशी घटना कधीही घडली नाही . आता मात्र परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी दोन्ही समाजघटकांनी शांतता राखावी असेही ते म्हणाले आहे. परस्परांवर हल्ले वा कुठलाही अनुचित प्रकार करू नका असे आवाहन त्यांनी केले. वास्तविक देशाच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या सैन्य दलावर आहे त्या ठिकाणी या दोन समाज घटकांच्या स्वतंत्र बटालियन कार्यरत आहेत. ही तेढ जर अशीच वाढली तर कसे होणार ?
मराठा क्रांती मोर्चा नसून तो मराठा शांती मोर्चा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांर्न हिंदू कोड बिलाला विरोध दर्शविला होता. बदलत्या परिस्थितीनुसार आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसह मराठांना आरक्षण दिलेच पाहिजे पण त्यासाठी घटनानिहाय संविधानानुसार त्यात बदल होतील यासाठी माझे मंत्रालय प्रयत्न करणार आहे.
अॅट्रासिटीचा गैरवापर झाला
अॅट्रासिटीचा गैरवापर झाला मात्र त्याला गावांतील अंतर्गत राजकारण आणि एक विशिष्ट गट कारणीभूत ठरला असा आरोप त्यांनी केला आहे. मागसवर्गीय यांनी आपल्या अडाणीचा फायदा कोणी घेऊ नये यासाठी सजग रहावे असे त्यांनी सांगितले आहे.
भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत रहावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे. मात्र सेना जर सत्तेतुन बाहेर पडणार असेल तर आम्ही भाजप सोबत पुढे जाऊ असे खा. आठवले यांनी सांगितले. दरम्यान, खा. आठवले यांनी पिडीत मुलीच्या कुटूंबियांची तसेच या प्रकरणात जखमी झालेल्या नागरिकांची जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट घेतली.