Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्च्याची तयारी पूर्ण

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्च्याची तयारी पूर्ण
, गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (18:01 IST)
नाशिकमध्ये शनिवारी मराठा क्रांती मूक मोर्चा होत आहे. यापाश्वभूमीवर शहरात कुंभमेळ्याच्या धर्तीवर सुरक्षेची सूक्ष्म तयारी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यात मोर्चा मार्गावर वॉच टॉवरची उभारणी, नो व्हेईकल झोन, बाह्य वाहनतळांचा वापर, लिंकरोडचा उपयोग, मदत केंद्र तसेच कंट्रोल सिस्टीम उभारण्यात आली आहे. याशिवाय शहर पोलीस तसेच विविध पथकांचे कर्मचारी असा सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 
 
ऍट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला तपोवनातून सुरु होणार आहे. सुमारे साडेसहा किलोमीटर अंतराच्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील १५ लाख नागरिक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
 
मोर्चामध्ये आंदोलकांच्या वतीनेच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात येणार्‍या सर्वच मार्गांची वाहतूक बाह्य वळण मार्गांनी वळवण्यात आली आहे. तर मोर्चेकर्‍यांच्या वाहनांसाठी शहरात येणार्‍या ७ मार्गांवर बाह्य वाहनतळांचे नियोजन करण्यात आले आहे. मोर्चा मार्ग पूर्णपणे नो व्हेईकल झोन असणार आहे. या मार्गाला जोडणार्‍या इतर लहान मार्गांवरील वाहतूक इतर ठिकाणांवरून वळवण्यात येणार आहे. मोर्चा मार्गावर सुरक्षेसाठी विविध बंदोबस्त पॉईंट तयार करण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात वापरण्यात आलेले वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. ठिकठिकाणी नागरिकांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. लहान मुले हरवू नये यासाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून अनाऊन्स सिस्टीमवरून पोलीस कर्मचारी घोषणा करणार आहेत. बिनतारी संदेश यंत्रणा कंट्रोल रूमवरून कार्यरत राहणार आहे. 
  
अनेक शैक्षणिक संस्थांकडून शाळा,महाविद्यालयांना सुट्टी
मोर्च्याला होणारी गर्दी लक्षात घेता अनेक शैक्षणिक संस्थांनी शाळा,महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. काही संस्थांनी अर्धवेळ शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मराठा विद्या प्रसारक समाज, महात्मा गांधी विद्या मंदिर, सपकाळ नॉलेज सिटी, ग्रामोदय शिक्षण, नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक, नाशिक एज्युकेशन सोसायटी अशा महत्त्वाच्या संस्थांनी शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्याचे जाहीर केली आहे.
 
*मोर्चा संदर्भात पार्किंग व्यवस्था * 
1) *मालेगांव,सटाणा,देवळा,चांदवड, पिंपळगाव,ओझरमार्ग़े येनारी वाहने* रासबिहारी स्कूल येथुन डावीकडे वलून नीलगिरी बाग़ येथील जाग़ेत पार्किंग करतील. तेथुन पायी तपोवनात येतील.
या मध्ये प्रत्येकाने आपली वाहने आपल्या तालुक्याच्या पार्किंगलाच लावुन तपोवनात यायचे आहे. मोर्चा संपल्यानंतर सिटी बसद्वारे मोर्चातील लोकाना पुन्हा पार्किंगच्या जागी सोडण्यात येणार आहे.
2) *दिंडोरी-कळवन मार्ग़े येनारी वाहने* मार्केट यार्ड-दिंडोरी रोड- महालक्ष्मी टोकीज समोर व मेरीच्या जाग़ेत पार्किंग करतील. तेथुन पायी तपोवनात येतील अथवा पंचवटी करंजा येथे मोर्चात सहभागी होतील.
3) *पेठ-हरसूल-गिरणारे-म.बाद* साठी-शरदचंद्र पवार मार्केट-RTO समोर-पार्किंग आहे. तेथुन लोकानी तपोवनात यायचे आहे.
*निफाड-येवला-नांदगावमार्ग़े येनारी वाहने* मिर्ची होटेल येथुन डावीकडे वलून जय शंकर फ़ेस्टीवल लॉन्स येथील मैदनात पार्किंग करतील. तेथुन पायी तपोवनात येतील.
4) *सिन्नर-भगुर-देवळाली-नाशिकरोड मार्ग़े येनारी वाहने* पुणा रोड़ने विजय-ममता टाकीज येथुन उज़वीकडे वलून तपोवन रस्त्याने मारुती वेपर्स चौकातून लक्ष्मीनारायण पुला शेजारील गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील मैदनात पार्किंग करतील. तेथुन पायी तपोवनात येतील.
5) *त्रिम्बक मार्ग़े येणारी वाहने* एबीबी सर्कल येथून उजव्या बाजूला वलतील. तेथुन पुढे सिटी सेंटर मॉल-गोविंदनगर-मुंबईनाका-द्वा रका-आग्रा रोडने पंचवटी कॉलेज येथे उजव्या बाजुला वलतील. तेथुन पुढे तपोवन रस्त्याने आठवण लॉन् येथे डाव्या बाज़ुला वलतील व चव्हाण मल्यात मैदनात पार्किंग करतील. तेथुन पायी तपोवनात येतील.
5) *इगतपुरी-घोटीमार्ग़े येणारी वाहने* मुंबई-आग्रारोड़ने फ़्लाईओवर वरून द्वारका चौकात खाली उतरून हायवे ने पंचवटी कॉलेज येथे उजव्या बाजुला वलतील. तेथुन पुढे तपोवन रस्त्याने आठवण लॉन् येथे डाव्या बाज़ुला वलतील व चव्हाण मल्यात मैदनात पार्किंग करतील. तेथुन पायी तपोवनात येतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही सज्ज एअर फोर्स