Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा क्रांती मोर्चा: महाराष्ट्राची राजधानी हलणार

मराठा क्रांती मोर्चा: महाराष्ट्राची राजधानी हलणार
मराठा मोर्चा आता लवकरच आपली राजधानी मुंबई येथे धडकणार असून एक मराठा आपली ताकद दाखवणार आहे. त्यामुळे अनेक पक्ष आता मूक ताकदीवर काय करावे असा विचार करत आहेत.
 
मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेचा निषेध आणि अॅषट्रोसिटी कायद्यासंदर्भातील मागण्यांसाठी मराठी क्रांती मोर्चातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. या सर्व मोर्च्यांचा शेवट दिवाळी आधी मुंबईत होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 
 
मागील महिन्यापासून मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येत मोर्चे निघाले. तर देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र यांचे प्रमुख शहर असलेले मुंबईतील मोर्चा हा सर्व मोर्चांचा परमोच्च बिंदू असनार आहे. मुंबईतील मोर्चाची तारिख अजून तरी जाहीर नाही. मात्र  लवकरच मुंबईतील मोर्चाचे नियोजन करणारी कोअर कमिटी निवडण्यात येणार आहे.
 
राज्यभरात निघालेल्या सर्व जिल्ह्यांतील मोर्चातील कोअर कमिटींचे पदाधिकारी मुंबईतील मोर्चामध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील मोर्चा हा अभूतपूर्व ठरणार आहे. मराठा क्रांती मोर्चाची कोअर कमिटी ते संदेश सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे, मात्र कोणालाही त्रास न देता हा मोर्चा यशस्वी करायचा आहे असे सर्वांनी ठरविले असून कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नाडीस यांच्या मुंबईत नसताना विना नेत्याच्या  इतक्या मोठ्या प्रमाणात सामील होत असलेल्या समाजातील लोकांकडेसर्व पक्ष आणि संघटना लक्ष ठेवून असून त्या पुरत्या हतबल झाल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 दहशतवाद्यांना कंठस्नान