Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा

श्री शंकर आरती

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा
NDND
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधर हो।
त्रिशूळ पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो।।
वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो।
विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ।।धृ।।

पडले गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरी हो।
त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरी हो।।
प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो।
औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ।।जय।।1।।

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो।
आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो।।
वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो।
तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ।।जय।।2।

ब्रह्मगिरींची भावे ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो।
तैं ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो।।
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो।
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पाया पडे हो।।जय।।3।।

लावुनिया निजभजनी सकळही पुरविसी माणकांना हो।
संतती संपत्ती देसी अंती चुकविसी यमयातना हो।।
शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो।
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ।।जय।।4।।

Share this Story:

Follow Webdunia marathi