Select Your Language
श्री विठ्ठल आरती
युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा ।चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।तुळसी माळा गळा कर ठेवुनि कटी ।कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।देव सुरवर नित्य येती भेटी ।गरूड हनूमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।। धन्य वेणुनाद अनुक्षेपत्रपाळा ।सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।राई रखुमाबाई राणीया सकळा ।ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। जय देव ।। धन्य पुष्पावती भीमासंगम ।धन्य वेणूनाद उभे परब्रम्ह ।धन्य पुंडलिक भक्त निर्वाण ।यात्रेसी येती साधु सज्जन ।। जय देव ।। ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।दिंड्या पताका वैष्णव नाचती ।पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।। आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। जय देव ।। -
संत नामदेव