ओवाळूं आरती सद्गुरु चैतन्यब्रह्मा। निगमागमा वर्णिता न कळे अगाध महिमा ।। ध्रू.।।
निर्गुण निराकार तेचि साकार झाले । जग उद्धरासाठी अगाध चरित्र केले । नामी रुपी मिळुनी असंख्य जीव उध्दरिले ।। १ ।।
ओवाळू आरती सद्गुरू चैतन्य ब्रह्मा । निगमा गम वर्णीता न कळे अगाध महिमा ।। धृ ।।
होता दृष्टादृष्टी अवघी सृष्टी चाकाटे । मोडूनि नास्तिक बुद्धी लावी भक्तीच्या वाटे । श्रीरामाच्या नामी असंख्य समुदाय लिगटे ।। २ ।।
अदभुत कली प्रबल्या माजी भक्ती वाढविली स्थापूनि मूर्तिपूजा अवघी भ्रांती निरसिली । सच्चीदा नंदमूर्ती डोळाभरी म्या पहिली ।। ३ ।।
ओवाळू आरती सद्गुरू चैतन्य ब्रह्मा । निगमा गम वर्णीता न कळे अगाध महिमा ।। धृ ।। ।।
जय जय रघुवीर समर्थ ।। ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
*********************
जयदेवा जयदेवा जय जय समर्था।। श्रीब्रह्मचैतन्या सद्गुरुनाथा ।। ध्रू.।।
तू अनिर्वचनीय परमात्मा अससी। लोकोद्धारासाठी नरतनु धरिलासी । माणगंगातीरी प्रगट झालासी।। गोंदवले ग्रामी कुलकर्णीवंशी।। जयदेवा ।।1।।
शरणागतासी त्वां निजसुख दिधले। दीनालागी कृत्य अद्भुत केले ।। जागोजागी राममंदिर निर्मियेले। भूमंडळी रामनामा गर्जविले।। जयदेवा ।।2।।
तू सच्चिदानंद तू स्वयंज्योति। भावे ओंवाळितो कर्पुर आरती ।। महाभागवताची तव पायीं प्रीती। घ्यावी सेवा सदा हीच विनंती ।। जयदेवा ।।3।।