Publish Date: Sun, 08 Oct 2023 (22:29 IST)
Updated Date: Thu, 09 Nov 2023 (00:14 IST)
जय जय श्रीगुरु श्रीपाद दत्ता । भय निवारण बालावधूता स्वामि ॥धृ.॥
चरण कमल ज्याचे मुक्तीचें स्थान । तरती भक्त जे करिती अखंड स्मरण ॥१॥
धरूनी युगायुगीं अनंत अवतार । असंख्य तारिले जड मूढ नर ॥२॥
ज्याचें भजन करी शिव चंद्रमौळी । दत्त निरांजन तया ओंवाळी ॥३॥(पंतमहाराज)