Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दत्त आरती - सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं

दत्त आरती - सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं
, शनिवार, 11 डिसेंबर 2021 (10:15 IST)
सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं ॥ द्वैतवात ही जाळुनी सहज अव्दैतीं भरूं ॥धृ.॥
अनुभवताटीं स्वयंज्योती सहज ओवाळूं ॥ जीवन्मुक्ती भोगुनी सहज गुरुपदीं लोळूं ॥१॥
वासनात्रय खंडुनी समूळ निर्वांसन होऊं ॥ प्रारब्धास्तव देह धरूनी सद्‌गुरुगुण गाऊं ॥२॥
ब्रह्मानंद भोगुनी आम्ही देऊं जनासी । कैवल्या हें उघड दावूं दत्त प्रेमरसीं ॥३॥(पंतमहाराज)
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Masik Durga Ashtami : आज मासिक दुर्गाष्टमी, या विधीनुसार देवीला करा प्रसन्न