Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
शनिवार, 11 जनवरी 2025
webdunia

प्रदक्षिणा

प्रदक्षिणा
, सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (17:19 IST)
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची । 
झाली त्वरा सुरवरा । विमान उतरायाची ।। धृ।।
 
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या रासी । 
सर्वही तीर्थ घडली आम्हां आदिकरुनी काशी ।।१।।
 
मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थ गाती । 
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती ।।२।।
 
कोटि ब्रह्महत्या हरीं करिता दंडवत । 
लोटांगन घालितां मोक्ष लोळे पायांत ।।३।।
 
गुरूभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी । 
अनुभव ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।।४।।
 
प्रदक्षिणा करुनि देह भावे वाहिला । 
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ।।५।।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री तुळशीची आरती