Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री म्हाळसा देवीची आरती

श्री म्हाळसा देवीची आरती
, शनिवार, 7 डिसेंबर 2024 (06:04 IST)
ओम जय माता म्हाळसाई, जय माता म्हाळसाई,
पिंपरखेड वासिनी, उंबरखेड वासिनी । गिरणा तीरी राही ।।
ओम जय माता म्हाळसाई ।।१।। [धृ.]
प्रथम चरित्री कालिका झाली, ओम कालिका झाली,
कलकत्ता वासिनी, देवावरदायिनी । गंगा तीरी राही ।।
ओम जय माता म्हाळसाई ।।२।।
द्वितिय चरित्री रेणुका झाली, ओम रेणुका झाली,
जमदग्नीच्या लागी चरणी, परशुरामाची झाली जननी । माहूर गडी राही ।।
ओम जय माता म्हाळसाई ।।३।।
तृतीय चरित्री भवानी झाली, ओम भवानी झाली,
श्रीरामा वरदायिनी, शिवराया वरदायिनी । तुळजापुरी राही ।।
ओम जय माता म्हाळसाई ।।४।।
चतुर्थ चरित्री म्हाळसाई झाली, ओम म्हाळसाई झाली,
मणिमल्ल दैत्य वधुनी, भक्ता सुख दायिनी । जेजुरी गडी राही ।।
ओम जय माता म्हाळसाई ।।५।।
पंचमस्थानी दास गोरक्षवरदायी, ओम गोरक्षवरदायी
मम कुल वरदायिनी, सेवका वरदायिनी । भक्ता सदनी राही ।।
ओम जय माता म्हाळसाई ।।६।।

ALSO READ: श्री खंडोबा महाराज तळी आरती

*********************** 
ALSO READ: खंडोबाचीं पदें
 
म्हाळसा बाणांची आरती
आरती जय शिव मल्हारी । भवभय संकट निवारी ॥धृ॥
मातले जव दोघे असुर । मणिका आणि मदन्नसुर । त्रासिले गो-ब्राह्मण फार । जहाला भूमीला भार ।
पृथ्वी ब्रह्मदेव इंद्र विष्णू । ऋषिवृन्द होती हतबुध । प्रार्थीती सकळही त्रिपुरारी । अभय दे शंभो मदनारी ॥१॥
शांतवी शंकर सकलाशी । म्हणे का भिता दैत्यासी । धाडीतो माराया त्यासी । गजानन आणि कार्तिकासाठी ।
स्वये मी घेतो अवतार । सगुण साकार हाती तलवार । दावीतो त्यांना यमनगरी । प्रबळ माझी धृतमार्गी ॥२॥
लागले द्वंद्वयुध्द हे जेव्हा दैत्य हे नारोपती । मांडिला देवांनी धावा । शंकरा धावा हो पावा । ऐकुनी करुणा देव वाणी ।
उठे शूळपाणे, खड्गपाणी मिळाले मुक्तिपद असुरी । स्थापिती तुजला जेजुरी ॥३॥
चंपाषष्ठी रविवार । मार्गशीर्षातला अवतार । अर्पिती पूजा उपचार । उधळिती बेल भंडार । येळकोट मल्हारी बोला ।
म्हाळसाकांत आमुचा तात मुख्य दैवता । भैरवा मार्तंडा तारी । मागतो दास तुझा वारी ॥४॥
शुभं भवतु ॥
शिवा मल्हारिया येळकोट येळकोट हो....॥


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खंडोबाचा अभंग आणि गोंधळ