suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत सावता माळी महाराजांची आरती

श्री संत शिरोमणी सावता महाराजांची आरती
श्री संत शिरोमणी सावता महाराजांची आरती
जय संता जय भक्ता ।जय सावत्या श्रेष्ठा ।
अगाध ज्ञान तुझे ।थोर प्रतापी वरिष्ठा ॥1॥ धृ.॥
 
माळियाचे वंशी । घेऊनिया अवतार ।
सकळिकांचा पूर्णपणे केला त्वा उध्दार ॥ 2 ॥ जय संता जय
 
संपूर्ण भक्तज्ञान । सकल वेद सार ।
देव त्वा साठविला । चिरूनिया उदर ।॥3॥ जय संता जय
 
देवे तुज गौरविले । जन्मोजन्मी साह्य केले।
दुर्जने तुज जासिले । ते दैव फजित झाले ॥ 4॥ जय संता जय
 
वश्वरूप बोध ठेवा । काशिबाशी दिधला ।
सकल संता भक्तभाव ।गृहस्था श्रमी दाविला ॥5॥ जय संता जय संता ॥
 
पूर्ण ज्ञानी जीवन्मुक्त । भक्तिज्ञान विसावा ।
आरणी दाखाविला । पुर्ण पाविञ ठेवा ॥6॥ जय संता जय
 
भिकू शरण आला तुज । पुर्ण अनन्य भावा ।
जागृत महिमा दावोनी । व्यक्त केला नीज ठेवा ॥7॥ जय संता जय
ALSO READ: Sant sawata mali Information in Marathi : संत सावता माळी यांची संपूर्ण माहिती

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

22 जुलै रोजी भौम प्रदोष, या पद्धतीने भगवान शिवाची पूजा करा, नियम जाणून घ्या