Publish Date: Fri, 15 May 2026 (06:22 IST)
Updated Date: Fri, 15 May 2026 (09:59 IST)
जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥
अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥
सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥
चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥
स्वानंद अनुलक्ष लक्षती सद्वृत्ती ॥
व्यक्ताव्यक्तरुपीं जय ब्रह्ममूर्तिं ॥जयदेव० ॥१॥
सृष्टी माजि लोक बोलती गौरीज ॥
पाहतां केवळ ब्रह्म अवतरलें सहज ॥
ह्मणऊनि सहचराचरी साधिती निज काज ॥
ऐसा परात्पर हा विघ्नराज ॥जयदेव० ॥२॥
सकळा देवामाजि तूं वक्रतुंड ॥
दोष छेदन कानीं होसी प्रचंड ॥
ध्यानीं अवलोकितां पूर्ण ब्रह्मांड ॥
शास्त्रादिक शोधितां निगमागम कांड ॥जयदेव० ॥३॥
सुखदासन मनमोहन फणि भूषण धारि ॥
हरनंदन सुरवंदन अघकंदनकारी ॥
मयुर वाहन पावन नयन त्रिधारी ॥
सादर वरद भक्तां होय विघ्नहारी ॥जयदेव० ॥४॥
गुरुवर कृपें योग दिसे अभेद ॥
पाहातां सर्वांठायीं हा मूळकंद ॥
पठण करितां योगीं निज चतुर्वेद ॥
विनवी चिंतामणी निजभावें वरद ॥जयदेव० ॥५॥
About Writer
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते.....
आणखी वाचा