वर्ष 2010च्या अंकांची बेरीज केली तर 2+0+1+0= 3 येते. अर्थात 2010 हे मुलांक 3 आहे. म्हणून या मुलांकाचे व इतर मुलांक असणार्या व्यक्तींना येणारे वर्ष कसे जाईल, हे आता आपण पहाणार आहोत.
मुलांक 1 : महत्त्वाकाक्षांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आत्मस्तृति करणे टाळावे. सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी गुरु अथवा वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. शुभ वार्ता कळतील.
मुलांक 2 : वर्षाच्या प्रारंभी अडचणी सोडवाव्या लागतील. आत्मविश्वास डगमगणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. काळजीपूर्वक कामे करा. शक्यतो, महत्त्वाचे कामे पुढे ढकलण्यास हरकत नाही.
मुलांक 4 : संमिश्र काळ राहील. प्रत्येक कामात परिश्रम घ्यावे लागतील. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. व्यापार-व्यवसायातील व्यवहार बिघडणार नाही, याची काळजी घ्या.
मुलांक 5 : मानसिक तणाव जाणवेल. अनुभवाचा चांगला उपयोग करून घेता येईल. आत्या- मामाला भेटवस्तू देऊन तर पहा..!
मुलांक 6 : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. नोकरी-धंदा व अन्य व्यवहारातून भरपूर धन मिळेल. मन प्रसन्न राहील.
मुलांक 7 : प्रवास योग संभवतो. कलाकारांना यश मिळेल. सामाजिक कार्य प्रतिष्ठा मिळवून देईल. आर्थिक योग उत्तम राहील.
मुलांक 8 : प्रत्येकाशी संयमाने वागा. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. धार्मिक भावना वाढेल.
मुलांक 9 : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. नव्या योजना कार्यान्वित करण्यास चांगला काळ. मित्रमंडळ व कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. टिप : प्रतिकूलता असल्यास गाय व गुरुची सेवा, अन्नदान, देवळात जाणे, अध्ययन सामग्री दान करणे व केळीची पूजा केल्याने यश मिळेल.