Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2010: भारतासाठी नववर्ष कसे राहील?

भारती पंडित

2010: भारतासाठी नववर्ष कसे राहील?

वेबदुनिया

ND
ND
2010 वर्षात भारताच्या कुंडलीचा मंगळ तृतीयस्थ आला आहे. शनि पंचममध्ये भ्रमण करतोय, राहु धनु राशीत आहे. आठव्या स्थानात शुक्र व बुध एकमेंकासोबत आहे. केतु द्वितीय भावस्थ आहे. गुरु दशम गोचरमध्ये स्थानबध्द आहे.


आर्थिक स्थिती-
महागाईवर नियंत्रण ठेवणे फारच कठीण जाणार आहे. योजना कार्या‍न्वीत करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. आर्थिक आवक ही सामान्य राहणार आहे. प्रगतीचा आलेख संथ गतीने वाटचाल करेल. मे महिन्यात गुरुचे पाठबळ वाढल्याने आवक वाढेल. वस्तूच्या किंमती सामान्यांच्या आवाक्यात येतील.


राजकिय स्थिती-
देशाच्या संपूर्ण राजकारण ढवळून निघणार आहे. अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना प्रत्येक पक्षाला करावा लागणार आहे. मोठ्या पक्षामधील नेत्यांच्या मनमानीमुळे नवीन योजनांना खिळ बसेल. पक्षाक्षात आरोपप्रत्यारोप सुरूच राहतील. भ्रष्टाचार, फसवणूक नवीन प्रकरणे चव्हाट्यावर येतील.

कलावंत-
webdunia
ND
ND

कलाकार तसेच या क्षेत्रात काम करणार्‍यासाठी वर्ष 2010 चांगले जाईल. नवीन शोध, पुरस्कार जाहीर होतील. गीत, नृत्य, चित्रकला, लेखन कलेतील कलावंताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराववर गौरविण्यात येईल तर किसी प्रतिष्ठीत कलाकारांची गुपेते जनतेसमोर येण्याची शक्यता आहे.

सामागिक स्थिती-
जनतेच्या दृष्टीने मात्र 2010 हे वर्ष फारसे चांगले नाही. महागाई व राजकारण यांच्यात सामान्य जनता अडकणार आहे. मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना आहे. मे महिन्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi