Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नववर्षाची सुरवात चंद्रग्रहणाने...

नववर्षाची सुरवात चंद्रग्रहणाने...

वेबदुनिया

WD
WD
नववर्ष 2010च्या प्रारंभीच चंद्रग्रहण आहे. 'थर्टि फर्स्ट'च्या रात्री पौष शुक्ल पक्ष पौर्णिमामध्ये आर्द्रा नक्षत्र व मिथुन राशीमध्ये चंद्रग्रहण होईल. ज्योतिष व वास्तुशास्त्रज्ज्ञ दीपक शर्मा यांच्यामते चंद्रग्रहण 31 डिसेंबरला रात्री 12 वाजून 22 मिनिटानी होईल व रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी ते समाप्त होईल. ग्रहणाचा कालावधी 1 तास 2 मिनिटाचा राहील.

चंद्रग्रहण हे संपूर्ण भारतात दिसणार आहे. हे एक खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. सूतक काळ 31 डिसेंबरला दुपारी 3.22 वाजता प्रारंभ होईल. मिथुन राशी व आर्द्रा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी ग्रहणकाळात विशेष सावधगिरी घेण्‍याची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी हे ग्रहण अशुभ आहे.

मेष, कर्क, सिंह, कन्या, तूळ या राशीवाल्यांना हे ग्रहण फलदायी आहे तर वृषभ, वृश्चिक, मकर व कुंभ राशीवाल्यांसाठी हे ग्रहण मिश्रित फळ देणारे आहे.

काय करावे:-
- ग्रहणापूर्वी स्नान आटोपून पूजनाशी संबंधित वस्त्र धारणकरून मंत्र जाप करावा.
- गर्भवती महिलांनी आपल्या पोटाव गाईचे शेन व गेरू लावून घ्यावा.
- ग्रहणानंतर यथाशक्तीप्रमाणे दान करावे.
- ग्रहणकाळात परमेश्वराचे नाम:स्मरण करावे.

काय करू नये:-
- ग्रहण काळात घराच्या बाहेर पडू नये.
- प्रवास, खाणे- पिणे वर्जित करावे.
- शुभकार्य कार्य करू नये.
- गर्भवती महिलांनी कापणे, शिलणे अशी‍ कामे करू नये.
- मूर्ती स्पर्श व पूजा वर्जित करावी.
- अग्नि संबंधित वस्तुपासून लांब रहावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi