Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज जन्म घेणाऱ्या बालकाचे भविष्य

आज जन्म घेणाऱ्या बालकाचे भविष्य

वेबदुनिया

ND
आज अर्थात 16 नोव्हेंबर रोजी जन्म घेणाऱ्या बालक किंवा बालिकाच मूलांक 7 असेल. या अंकाचे संचलन वरूण ग्रह करतो. या दिवशी जन्म घेणारा बालक उदार मनाचा असेल. त्याची प्रवृत्ती पाण्यासारखी असेल. ज्याप्रमाणे पाणी त्याचा स्वत:चा मार्ग ठरवतो त्याच प्रकारे हा बालक ही बऱ्याच अडचणींना मात देऊन आपला मार्ग कायम करेल व त्यात प्रशंसा मिळवेल.

आज जन्म घेणारा बालक दुसऱ्याचे मन जाणून घेणारा असेल. हा बालक पुनर्वसू नक्षत्राचा असेल. या नक्षत्रात जन्म घेणारे बालक विचारपूर्वक कार्य करणारे, हुशार, चांगल्या वस्त्रांचे शौकीन, अभिमानी, उच्चाभिलाषी, उत्तम व महत्त्वपूर्ण पद प्राप्त करणारे पण थोडे आळशी असतात.

webdunia
ND
या दिवशी जन्म घेणाऱ्या बालकाच्या गोचर कुंडलीचे लग्न तूळ असेल. 15 तारखेला शनीने तूळ राशीत प्रवेश केला आहे म्हणून शनी केंद्रस्थानी राहील. सूर्य तेथे अगोदरच आहे. या बालकाची राशी मिथुन असेल. सप्तम स्थानात गुरू आहे. शुक्र, राहू, बुध द्वितीय घरात आहे. राहूमुळे वाणीत किंचित कटुता येईल पण शुक्राच्या प्रभावामुळे त्यात प्रखरता देखील राहील. मंगळ आय स्थानात असणे म्हणजे हे धनवान असण्याचे लक्षण आहे. या गोचर कुंडलीत केतू अधिष्ठित चंद्र भाग्य स्थानात असणे हे पत्रिकेतील सर्वोत्तम योग आहे.

जर बाळाचा जन्म सकाळी 10च्या सुमारे झाला असेल तर त्याचे धनू लग्न असेल. सूर्य व शनी आय स्थानात असतील. मंगळ सिंह राशीच्या भाग्य स्थानात असेल. बुध राहू व शुक्र 12व्या घरात असतील. 11व्या घरात शनी माता-पितेस कष्टकरी असू शकतात. पंचम स्थानातील गुरू श्रेष्ठ वक्ता बनवतो. 12व्या स्थानातील शुक्र जन्मभर अत्यधिक धनवान बनवतो. ऐकून आज जन्म घेणाऱ्या बालक किंवा बालिका जन्माला आल्यापासूनच भाग्यशाली आहे पण आरोग्याच्या दृष्टीने थोडे कष्टकारी असल्यामुळे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तसेच मंगळ पंचमेश आणि द्वादशेष होऊन भाग्यस्थानी असल्यामुळे काही अडचणींचा सामना त्याला करावा लागणार आहे.

शुभ दिनांक : 7, 16, 25

शुभ अंक : 7, 16, 25, 34

शुभ वर्ष : 2014, 2018, 2023

आराध्य देव : शिव तथा विष्णू

शुभ रंग : पांढरा, पिंक, जांभळा, मरून


Share this Story:

Follow Webdunia marathi