Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जानेवारी 2011महिन्याचे भविष्यफल!

जानेवारी 2011महिन्याचे भविष्यफल!

वेबदुनिया

मेष
जानेवारी 2011 या कालावधीत मेष राशीच्या व्यक्तींनी नौकरी आणि उद्योगांमध्ये सतर्क रहाण्‍याची गरज आहे. या दोनही गोष्टींमध्ये संकटं येण्‍याची शक्यता आहे. या कालावधीत विरोधक आणि शत्रू अधिक बळकट होण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे ताकही फुंकून प्यावे.निर्णय घेताना काळजी घेणे गरजेचे.

वृषभ
जानेवारी 2011 या महिन्यात काही शारीरिक व्याधी डोके वर काढण्‍याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एखादा जुना रोग पुन्हा त्रासदायक ठरु शकतो. आर्थिक बाबींचे गणित बिघडल्याने या विषयीची चिंता मनात राहिल.नौकरीत साहेबांची मर्जी राखण्यासाठी नेहमीप्रमाणेच कसरत संभावते.

मिथुन
जानेवारी-2011 आत्मविश्‍वास वाढेल, जोखीम पत्करावी लागेल. हिम्मत ठेऊन काम करा. आर्थिक योग चांगले आहेत. प्रॉपर्टी किंवा कौटुंबिक वाद‍-विवाद होण्‍याची शक्यता असल्याने मन शांत ठेवा. मनावर संयम ठेवा.

कर्क
जानेवारी-2011 या महिन्यात स्वभावामुळे काही अडचणी येण्याची शक्यता आहे. मन विचलीत असल्याने चिंता वाढेल. विरोधक अधिक आक्रमक होत असल्याचे दिसून येईल. मुलांविषयीची चिंता सतावेल. आर्थिक निर्णय घेताना जरा सतर्क रहाण्‍याची गरज आहे.

सिंह
जानेवारी 2011 या महिन्यात कामाचं ओझं वाढणार असल्याने सुरुवातीला चिंतेने मन ग्रासलेले असेल. आर्थिक वाद वाढल्याने पैशांची चणचण जाणवेल कौटुबिक वाद वाढल्याने मन उदास होईल, पण मनावर संयम ठेवा.

कन्या
जानेवारी 2011 या महिन्यात तर्क-वितर्क वाढल्याने मनावर काहीसा ताण जाणवेल. वाद-विवाद टाळा. नौकरीवर व कामावर लक्ष केंद्रीत करा. आर्थिक योग उत्तम. एखाद्या सामाजिक कामात सहभाग नोंदवाल.

तुळ
जानेवारी 2011 हा महिना आपल्यासाठी सर्वसाधारण ठरेल. मनातील उत्साह कायम राहिल. नवीन विचार निर्माण होतील. उत्साह कायम असल्याने कामाचा कंटाळा येणार नाही. गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे. पैसे गुंतवताना दहावेळा विचार करावा.

वृ‍श्चिक
जानेवारी 2011 एखादे साहसीक काम या महिन्यात आपल्या हातून घडणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. जुन्या ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. प्रॉपर्टीचे काम मार्गी लागेल. कुटुंबाचे चांगले सहकार्य मिळेल. संगीत क्षेत्रात असलेल्या व्यक्तींसाठी चांगला महिना.

धनु
जानेवारी -2011 प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत.

मकर
जानेवारी 2011 या महिन्यात तुमच्यातील राग, चिडचिडेपणा वाढण्‍याची शक्यता आहे. वातावरण खराब असल्याने मनात उदासीनता दिसून येईल. आर्थिक जबाबदारी वाढल्याने तसेच यासाठी काहीजण तगादा लावण्‍याची शक्यता आहे. कुटुंबाकडून मदत होण्याची शक्यता आहे.

कुंभ
जानेवारी 2011 आरोग्याची हेळसांड करुन चालणार नाही. वेळेवर उपाय करणे गरजेचे आहे. ताण-तणाव आणि दुर्लक्ष केल्याने अडचणी वाढतील. खर्चावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. सामान्य लाभ होईल. व्यवसायात योग्य निर्णय घ्यावा.

मिन
जानेवारी 2011 ठरवल्याप्रमाणे काम मार्गी लागणार नसल्याने या महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. मतभेद वाढल्याने मन अशांत राहिल याचा परिणाम आपल्या निर्णयांवर दिसून येईल.कौटुंबिक समस्या वाढतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi