Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॉन अब्राहम : चाहत्यांची संख्या वाढेल!

जॉन अब्राहम : चाहत्यांची संख्या वाढेल!

वेबदुनिया

IFM
जॉन अब्राहमचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी मुंबई येथे भरणी नक्षत्रात झाल्यामुळे तो बुद्धिमान आणि सुखी आहे. जॉनने आपल्या कामाकडे थोडे अजून लक्ष्य घातले तर तो नक्कीच उच्च स्थानावर पोहचू शकतो. सूर्य भाग्यात वाढ करतोय. जन्म वेळेस धनु राशीवर सूर्याचे परिभ्रमण असल्यामुळे व्यक्ती जग विख्यात बनतो.

जन्म वेळेस मंगल स्वराशीस्थ असून तो भ्रमण करणारा बनवतो. बुध कष्टांना दूर करतो. जन्मा वेळेस गुरू ज्या राशीत असतो, त्याच्या परिणामस्वरूप व्यक्तीला उच्च स्थान, सन्मान प्राप्त होतो. गुरू कुंडलीत ज्या भावात असतो, तो आर्थिक संपन्न बनवतो. शुक्र ज्या राशी बरोबर असतो, त्या प्रमाणे जातकाला सुंदरता प्रदान करतो. तोच शुक्र आपल्या लोकांचा विरोधही दर्शवतो. म्हणून जॉनला विचार करून आपले व्यवहार करायला पाहिजे. शनी गृहस्थ जीवनात त्रास देऊ शकतो. भवितव्यात तुमचे विचार व व्यवहारामुळे गृहस्थ जीवन व नात्यात दुरावा येऊ शकतो.

कुंडलीत असलेला केतू मूत्रपिंडाचा त्रास देऊ शकतो, त्यासाठी राहू-केतूची शांती करायला पाहिजे. इष्ट देवतेची पूजा-अर्चना केली पाहिजे. जॉनचा जन्म शुक्राच्या महादशेत झाला आहे, ज्याचा भोग्यकाल 18 वर्ष 4 महिने 5 दिवसाचा आहे. वर्तमानात मंगळाची महादशा सुरू आहे. जी 22-4-2007 ते 22-4-2014 पर्यंत चालणार आहे. मंगळाच्या महादशेत बुधाची अंतरदशा चालू आहे, जी 19-10-2011पर्यंत राहणार आहे. त्यानंतर केतूची अंतरदशा 16-3-2012 पर्यंत राहील.

सद्या डिसेंबर ते जानेवारी शेवटपर्यंत प्रतिस्पर्धेंसाठी डोकेदुखी राहाल. तुझ्या चाहत्यांची संखेत वृद्धी होईल. त्याच बरोबर नवीन संधी मिळेल. फेब्रुवारी-मार्चमध्ये कुठले ही नवीन काम विचार करून करायला पाहिजे. अप्रिय समाचार किंवा एखाद्या विपरीत घटनेमुळे मानसिक तणाव मिळण्याची शक्यता संभवते.

वर्ष 2011 समिश्रित परिणाम देणारा राहील. जॉनसाठी रविवार भाग्यशाली राहिलं. 1, 6, 11 या तारख्या त्यासाठी अशुभ आहे. मूंगा, पुखराज आणि माणिकाचे संयुक्त लॉकेट धारण केल्याने यश नक्कीच मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi