Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जूनमध्ये 4 ग्रह बदलत आहे आपले घर, जाणून घ्या तुमच्या राशीवर याचा परिणाम

जूनमध्ये 4 ग्रह बदलत आहे आपले घर, जाणून घ्या तुमच्या राशीवर याचा परिणाम
जूनच्या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र राशी बदलणार आहे. या ग्रहांचे राशी परिवर्तनाचे सर्व राशींवर चांगला व वाईट प्रभाव पडेल. तर मग आपण जाणून घेऊ कोणत्या राशीवर कसे राहील हे ग्रह परिवर्तन...
 
मेष राशीच्या जातकांसाठी महिन्याचा पहिला टप्पा फारच कठिण जाणार आहे. व्यर्थाचा मानसिक त्रास राहण्याची शक्यता आहे. व्यर्थ धावपळ आणि अनावश्यक खर्च शक्य आहे. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मंगळ वक्री झाल्यानंतर राशी स्वामी मंगळाची दृष्टी मेष राशीवर असल्यामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे. आपसातील मतभेद वाढतील. तसं हा परिवर्तन नोकरी-व्यवसायासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन कामाचा शुभारंभ होईल. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.   
 
वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना फारच अनुकूल जाणार आहे. महिन्याच्या पहिल्या टप्प्यात राशी स्वामी शुक्राचा सूर्यासोबत लग्न स्थानात असल्यामुळे लाभदायक ठरणार आहे. बरेच बिघडलेले काम पूर्ण होतील, साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनोरंजन आणि भौतिक सुख-सुविधांवर धन व्यय होईल. रागावर नियंत्रण ठेवणे फारच गरजेचे आहे. आपसातील नाराजगीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. महिन्या शेवटच्या टप्प्यात भावंडांकडून लाभ आणि सहयोग मिळेल. 
webdunia
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना मिश्रित फल देणारा ठरणार आहे. या महिन्यात राशीचा स्वामी बुध महिन्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या आठवड्यापर्यंत राशीच्या बाराव्या घरात चालेल, ज्याने लांबच्या पल्ल्याचा प्रवासाचा होण्याची शक्यता आहे. या महिन्यात परिश्रम आणि धावपळ करावी लागणार आहे. खर्च वाढेल आणि स्वास्थ्य संबंधी त्रास होऊ शकतो. जास्त काम असले तरी कार्यक्षेत्रात सजगतेने काम करावे लागणार आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.  
 
कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना फारच लाभदायक ठरणार आहे. शुक्राची शुभ स्थितीमुळे नोकरी-व्यवसायात लाभ मिळेल, मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. याच्या प्रभावामुळे पारिवारिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे, जोडीदार आणि संतानं पक्षाकडून शुभ वार्ता मिळेल. व्यवसायात नवीन लोकांशी संबंध लाभकारी ठरणार आहे, पण महिन्याच्या शेवटच्या टक्क्यात शुक्राचे राशी परिवर्तनामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याबद्दल चढ उतार राहणार आहे, खर्च आणि गुंतागुंत वाढेल.  
 
सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना सामान्य राहणार आहे. सीमित आय, पण खर्च वाढेल. शुभ कार्यांमध्ये व्यय झाल्याने मन प्रसन्न होईल. धर्म-कर्माकडे ओढ वाढेल. कुटुंबीयांसोबत तीर्थयात्रा किंवा धार्मिक स्थळाच्या यात्रेचा योग आहे. नोकरी-व्यवसायात कार्यभारामुळे मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे.  
webdunia
कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. ग्रह परिवर्तन विकास आणि प्रगतीचे योग बनत आहे. आर्थिक पक्षात भाग्य प्रबळ आहे. राशी स्वामी बुधाच्या भाग्य स्थानावर असल्यामुळे बिघडलेले काम बनतील. नोकरी-व्यवसायात मनाप्रमाणे परिवर्तन संभव आहे. जातकाला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.   
 
तुला राशीच्या जातकांचे राशी स्वामी या महिन्याच्या पहिल्या टप्प्यापर्यंत आठव्या घरात राहतील ज्याने आरोग्याच्या बाबतीत त्रास होणे शक्य आहे. आरोग्याची काळजी ठेवावी लागणार आहे. घरगुती त्रास वाढण्याची शक्यता आहे आणि खर्चांमध्ये वाढ होईल, पण महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात शुक्राचे राशी परिवर्तनामुळे स्थितीत सुधारणा होईल, जीवनाच्या बर्‍याच क्षेत्रांमध्ये लाभ मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये 
लाभ मिळण्याची शक्यता आहे पण त्याच्यासाठी फार जास्त परिश्रम करावे लागणार आहे.  
 
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना फारच चढ उतारीचा जाणार आहे, कारण एकीकडे सूर्य शनीचे समसप्तक योग बनत आहे तर दुसरीकडे राशीचे स्वामी मंगळ वक्री होणार आहे. ग्रहांची या स्थितीमुळे भागेदारीच्या कामांमध्ये त्रास आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. जोखीम घेणे टाळावे, अपघात होण्याची शक्यता आहे. पारिवारिक जीवनात मतभेद संभव आहे. कुटुंबीयांनी पटणार नाही. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
webdunia
धनू राशीच्या जातकांसाठी राशीचे स्वामी गुरुची दृष्टी अनुकूल फल देणारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात स्थिती उत्तम राहील, प्रभाव आणि  मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभ आणि प्रगतीची संधी मिळेल. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात जातक दूरचा प्रवास करू शकतो. खर्च वाढतिल. मानसिक त्रास आणि अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.   
 
मकर राशीच्या जातकांच्या राशीचे स्वामी शनी वक्री असल्यामुळे ह्या महिन्यात पारिवारिक आणि आर्थिक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या वेळेस शुक्राची स्थिती देखील अनुकूल दिसत नाही आहे ज्यामुळे व्यावसाय‌िक क्षेत्रात नवीन आव्हान येतील आणि लाभ मिळणे फारच अवघड आहे. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मंगळाची उच्च दृष्टीमुळे मान-सम्मानात वाढ होईल. धनलाभ आणि प्रगतीची विशेष संधी मिळेल.  
 
कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना फारच सुखदायक ठरणार आहे. सरकारी क्षेत्रात असलेल्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात पण भाग्य प्रबल असल्यामुळे नक्कीच यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दान-धर्मात आवड निर्माण होईल. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. पारिवारिक कलह संभव आहे. मित्र-बांधवांशी आपसी मतभेद आणि त्रास संभवतो. व्यर्थ विवादात पडू नये.  
 
मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना संमिश्र जाणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूलता राहणार आहे. भाग्य साथ देईल आणि प्रयास केल्यास  योजनांमध्ये यश मिळेल. राशीचे स्वामी गुरू राहूसोबत सहाव्या घरात असल्यामुळे पोटाशी निगडित त्रास संभवतो. एखादी गुप्त चिंता होऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घराचा करा स्वर्ग