Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साप्ताहिक भविष्यफल 24 ते 30 एप्रिल 2016

वेबदुनिया

विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. 


वृषभ

webdunia

WD

मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाली घडून येतील. विविध व्यावसायिक उपक्रम राबविण्यात यश येईल. कौशल्याला चांगला वाव मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. मनातील कल्पना आकारात घेतील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे.


मिथुन

webdunia

WD

चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळेह्न निर्णय घेण्यास विलंब लागेल. सकारात्मक विचारुंळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. वैयक्तीक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडतील.

कर्क

webdunia

WD

आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात मात्र कामाच्यामानाने आपली आवक कमी राहण्याची शक्यता आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. शेजार्यांचे सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल. लेखक, साहित्यिकांना आपल्या दर्जेदार लिखाणाबद्दल पुरस्कार मिळतील. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्यावर सोपवू नका. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल.

सिं

webdunia

WD

जूनी येणी वसूल होतील. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. महिला स्वतःच्या पद्धतीने गृह सजावट करतील.महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील.

कन्या

webdunia

WD

घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आपल्या सहकार्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मित्रपरिवाराबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. आपल्या वक्तृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल.

तूळ

webdunia

WD

घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून चांगले लाभ घडून येतील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे विना सायास मार्गी लागीतल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त दूरवर प्रवास घडून येतील. जनसंपर्कातून लाभ होतील. सार्वजनिक कामातून आपला नावलौकीक वाढेल.

वृश्चिक

webdunia

WD

संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील.नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील.दुसर्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.धाडसी निर्णय घेतले जातील.

धनु

webdunia

WD

पूर्वीच्या मिळालेल्या कामतील ऑर्डर्स वाढविल्या जातील. आपल्या अधिकार कक्षेत वाढ होऊन एखादी सवलत मिळेल. व्यवसाय उद्योगासाठीची कर्ज प्रकरणे मंजूर होतील. संशोधनपर अभ्यासक्रमाची पूर्तता होईल. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे.आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल.

मक

webdunia

WD

चांगल्या व्यक्तींची भेट होईल. कुटुंबीयांबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाच्या जबाबदार्या पार पाडणे अवघड होईल. स्वसंपादीत धनाचा उपभोग घेता येईल. समाधान लाभेल.


कुंभ

webdunia

WD

आपली प्रतिमा डागाळणार नाही यासाठी सतर्क राहा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. रवि, बुध तरुणांच्या कौशल्याला वाव देणारे आहेत. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. कवि, कलाकार, गायक, वादक, लेखक, साहित्यिक यांच्यासाठी हा आठवडा विशेष संधी उपलब्ध करुन देणारा राहील. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील.

मीन

webdunia

WD

सरकारी परवाने मिळतील. सरकारी नोकरीत असलेल्या तरुणांना पदोन्नती मिळेल. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आज आपली निकड भागणार आहे. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुंदर दिसायचे असेल तर शुक्र मजबूत करा, काही सोपे उपाय