Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जानेवारी 2016तील भविष्यफल

जानेवारी 2016तील भविष्यफल
, गुरूवार, 31 डिसेंबर 2015 (15:40 IST)
मेष : नोकरी उद्योगात उत्तम प्रगती साधाल. घरगुती जीवनात तणाव येणे शक्य आहे; परंतु, व्यवसायिक आयुष्यात मात्र तुम्हाला यशाची भरपूर फळं चाखायला मिळणार असं दिसतं आहे. व्यवसायिकांसाठी, त्यांनी मोठी गुंतवणूक न करणे हे उत्तम. यामहिन्यात  अनावश्यक खर्च करण्याची सवय नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे.

webdunia

वृषभ : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. नोकरवर्गाला कदाचित काही समस्या भेडसावतील. व्यवसायिकांना नफा होईल, तत्काळ नाही परंतु हळूहळू. प्रेम जीवन बहरेल, त्यातून तुम्हाला सर्व प्रकारचा आनंद मिळेल. आतून सुखद भावना असेपर्यंत कोणतीही गोष्ट सहजप्राप्य राहील. परंतु, तुमच्या लैंगिक आकांक्षांमुळं आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. यातून बेकायदेशीर प्रकरणं उद्भवू शकतात. अशा गोष्टींचे परिणाम काय होतात हे कळण्याइतके आपण हुशार आहातच; म्हणून, त्यांच्यापासून दूर राहा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती उत्तम राहील.
webdunia
मिथुन : या महिन्यात वेळेला जास्त महत्त्व द्या. यश लाभेल. तुमचं शरीर तुमचं मंदीर आहे; त्यामुळं, त्याबाबत आपण अतिशय गंभीर राहा. आपल्या दैनंदिनीत आरोग्यदायक आहार आणि व्यायाम अवश्य असू द्या. तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा, कारण येणारा पैसा थोडा आखडू शकतो. प्रत्येक आर्थिक संकटापासून मुक्त राहण्यासाठी, कर्ज घेणे टाळा. प्रेमाच्या गोष्टी आश्वासक आहे, कारण प्रणयामुळे तुमचं जीवन सुखानं भरून जाईल. 

webdunia
कर्क : या महिन्यात तुमच्या आर्थिक व्यवहारांबाबत काळजी घ्या. कोणावरही अंध विश्वास ठेवल्यास आर्थिक तोटा होऊ शकतो. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवणं उत्तम, कारण कोणी तुमच्याविरुद्ध कट करु शकतो. यंदाचं वर्ष नोकरीतील बदलासाठी सर्वोत्कृष्ट आहे; म्हणून, हा बदल करण्याच्या तुमच्या नियोजनाचे प्रयत्न वाढवा. काही जणांवरील कामाचा भार वाढेल, त्यामुळं त्यांचा पगार देखील वाढेल. या राशीचे काहीजण अन्य जातीच्या जोडीदाराच्या प्रेमात पडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार फायदेशीर ठरतील नि मनावरचा ताण कमी होईल. 
 
webdunia
सिंह : तुमच्या आर्थिक जीवनाबाबत बोलायचं तर, हे वर्ष त्यासाठी देखील उत्तम दिसत आहे. तुमची संपत्ती वाढेल आणि त्याचसोबत तुमच्या बँक बॅलन्सही. तुमचा स्वतःचा व्यवसाय असो किंवा एखाद्या फर्ममध्ये नोकरी असो, नफा हमखास होणार. तुमच्या व्यवसायिक जीवनात नाव, पत आणि प्रशंसा वाढेल. तुमच्या तब्येतीच्या अनुशंगानं, वजन वाढत असल्याचं दिसत आहे. ते नियंत्रणात ठेवून तुमचं शरीर रोगमुक्त राखण्यासाठी, अवजड आहार घेणं थांबवा. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. 
webdunia
कन्या : तुमचे आरोग्य तुमच्या हाती आहे; तुम्ही ते जितक्या गंभीरपणे घ्याल, तितकं ते चांगलं राहील. पैशांच्या बाबतीत तोटा होणे शक्य आहे. गुरू बाराव्या स्थानात राहण्याने तुम्हाला समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूचा तुम्हाला त्रास होईल असं दिसतं, कारण तब्येत देखील बिघडण्याचे संकेत आहेत. सुरुवातीचे 15 दिवस फारच अनुकूल आहे. 
 
webdunia
तूळ : या महिन्यात नोकरीतील लोकांचं आयुष्य उत्तम दिसून येत आहे; परंतु व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आपल्या भविष्यावर बारकाईनं नजर टाकली तर ११ जानेवारीनंतर घडामोडी आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्च उपटू शकतात. हे खर्च खूप मोठे असू शकतात, आधीपासूनच काळजी घ्या पैसे देताना किंवा घेताना दक्ष राहा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यामध्ये समजूतदारपणा दाखवा आणखी काही नको. या महिन्यात आजारीपणा, मानसिक अस्वस्थता यातून मनाने बाहेर पडा. 
webdunia
वृश्‍चिक : या महिन्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तिंनी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराशी जुळवून घेण्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात सतत चढ-उतार येत राहतील. तुमच्या मुलांच्या वर्तनामुळे काहीवेळेस तुमच्यावर ताण येईल. आळसावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला कार्यरत ठेवा ही सूचना. निरुत्साही वागणे आणि मौजमजेतच वेळ घालवणे यामुळे तुमच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक समस्येत एकमेकांना समजून घ्या. नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी प्राप्त  होईल.
webdunia
धनू : या महिन्यात जंतू आणि प्रदूषित वस्तुंमुळे रोग उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तिंसाठी हा महिना लाभदायक राहील. वाद टाळण्यासाठी आणि सर्वांसोबत संबंध सुरळीत ठेवण्याकरिता, हे वर्तन अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या आर्थिक जीवनाचा विचार करता, सर्व ठीकठाक दिसतं, परंतु घोटाळे आणि फसवणूक यांच्यापासून तुम्ही स्वतःचं रक्षण करण्याची गरज आहे. व्यवसायिकांसाठी भाग्य कार्ड यामहिन्यात  लाभकारक नाही. राजकारणात, सामाजिक कार्यात आपला प्रभाव वाढेल. 
webdunia
मकर : या महिन्यात ग्रहमान तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहे. हा सल्ला पाळा अन्यथा परिणामांसाठी तयार व्हा. अपचन, डोकेदुखी, आणि मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करतील. आर्थिक आघाडीवर, केतुची दशा नसेल तर अत्यंत फायद्याचे सौदे राहतील. तुमच्या नोकरीमार्फत मोठे लाभ तुमच्यापर्यंत येतील; त्याद्वारे तुम्हाला प्रतिष्ठा आणि आदर मिळेल. तुमच्यापैकी काही जणांना नवीन आणि अधिक चांगली नोकरी मिळेल. व्यवसायिकांसाठी देखील असेच फायदे आणि निष्कर्ष मिळण्याचा अंदाज आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. 
webdunia
कुंभ : नोकरी करणारे कुंभ व्यक्तींना हा महिना नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि प्रगती मिळवून देईल. तुमचे वरिष्ठ किंवा जोडीदार असोत, प्रत्येकाला तुमच्यातील कुशल कर्मचारी दिसेल, आणि तुमच्यावर ते प्रशंसेचा पाऊस पाडतील. तुम्ही व्यवसायिक असाल तर दुःखी होण्याचं कारण नाही, कारण जानेवारी 2016 तुमच्यासाठी देखील लाभदायक ठरणार आहे. अखेरीस; प्रेम जीवन देखील योग्य मार्गावरच राहील. साहित्य सिनेनाट्य क्षेत्रातील लोकांना उत्तम संधी चालून येतील. 
webdunia
मीन : या महिन्यात कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नाही. काळजीपूर्वक वर्तन आणि हुशारीने कृती करणे तुमच्या मार्गीतल समस्या दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तुम्ही केलेली कोणतीही चूक मोठे परिणाम घडवू शकते; त्यामुळे, प्रत्येक गोष्टीबाबत अतिशय काळजीपूर्वक राहा. आर्थिक बाबी सामान्य राहतील. नोकरीच्या आरंभिक टप्प्यांमध्ये समस्या उद्भवू शकतात; परंतु, तुम्हाला नंतरच्या काळात प्रचंड यश मिळेल. नवीन योजना आखा, नवीन परिचय ओळखीतून फायदा होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi