नवीन वर्षांत राश्याधिपती गुरू भाग्यस्थानात आणि दशमस्थानात भ्रमण करेल. गुरूचे हे भ्रमण चांगले असल्यामुळे मनामध्ये एक प्रकारची उभारी राहील. व्ययस्थानातील शनी आणि तेथेच बराच काळ राहणारा मंगळ तुम्हाला त्रासदायक आहे. प्रत्येक गोष्ट मिळवताना ज्या हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत, त्यावरून ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ याची तुम्हाला आठवण येईल. ऑगस्टनंतर पुढे प्रगतीत सुधारणा होईल. ऑगस्टच्या आधी तुमचा राग नियंत्रण ठेवावा ही सूचना. वाद टाळण्यासाठी आणि सर्वांसोबत संबंध सुरळीत ठेवण्याकरिता, हे वर्तन अत्यंत महत्वाचे आहे.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्षांचे वर्णन मानलं तर समाधान असे करता येईल. जानेवारीपर्यंत पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम पार पडेल. कुटुंबीयांसह छोटी ट्रिप काढल्यामुळे तुम्ही ताजेतवाने व्हाल. एप्रिल ते जुल यादरम्यान एखादे जुने घरगुती प्रकरण अचानक उद्भवल्यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल. मनातल्या गोष्टी मनात ठेवाव्या त्याचा राग इतरांवर काढू नका. जुने आजार असतील तर ते डोके वर काढतील. जुलनंतर तुम्ही उसने अवसान आणून काम कराल. एखादे लांबलेले शुभकार्य सप्टेंबर ते पुढील दिवाळीपर्यंत पार पडेल. येत्या वर्षांत नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याशी हितसंबंध बिघडू देऊ नका. धनु राशीच्या व्यक्तिंना सदैव कुटुंबातील सदस्यांसोबत वाद घालण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत देखील तंटा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. यावर्षी जंतू आणि प्रदूषित वस्तुंमुळे रोग उद्भवण्याची शक्यता आहे.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : नोकरदार व्यक्तिंसाठी हे वर्ष लाभदायक राहील. तुमच्या आर्थिक जीवनाचा विचार करता, सर्व ठीकठाक दिसतं, परंतु घोटाळे आणि फसवणूक यांच्यापासून तुम्ही स्वतःचं रक्षण करण्याची गरज आहे. नोकरदार व्यक्तींना जानेवारीपर्यंतचा कालावधी संमिश्र आहे. कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला आराम करण्याची त्यांची मनोवृत्ती राहील. जानेवारी ते मार्च यादरम्यान एखादी विशेष सुविधा कंपनीतर्फे पुरविण्यात येईल. पण त्याच्या बदल्यात कष्टदायक कामाची नांदी केली जाईल. एप्रिल ते जुल या कालावधीत चांगले काम
मिळेल. मात्र विश्रांती हा शब्दच नको. जुलनंतर वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुमच्याकडून जास्त काम करून घेतील. सप्टेंबरनंतर तुमचा तणाव कमी होईल. व्यवसायिकांसाठी भाग्य कार्ड यावर्षी लाभकारक नाही. तुमची कामं आणि निर्णयांबाबत अत्यंत खबरदारी घ्या, नाहीतर तुम्हाला कदाचित तुरुंग पाहावा लागेल. असे प्रतिकूल प्रसंग टाळण्यासाठी, बेकायदेशीर गोष्टी आणि प्रकरणांपासून दूर राहा. अखेर, यावर्षी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट प्रयत्नांची जोड द्या.
व्यापार-उद्योगात डिसेंबपर्यंतचा कालावधी चांगला आहे. पैसे मिळत राहिल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा बळावतील. जानेवारी ते मार्च यादरम्यान ओळखींमुळे किंवा पूर्वी केलेल्या चांगल्या कामामुळे तुम्हाला नवीन काम मिळेल. जे काम तुम्ही पूर्ण केले आहे त्याची ताबडतोब वसुली करण्याचा प्रयत्न करा. मार्चनंतर साधी आणि सोपी वाटलेली कामे अवघड झाल्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. काही नवीन आणि अनपेक्षित खर्च उद्भवल्यामुळे तुमचे पैशाचे गणित मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुल यादरम्यान नवीन कामाचा मोह न धरता जे आहे त्यावर समाधान माना. जुलनंतर पुढील दिवाळीपर्यंत मोठय़ा कष्टाने सर्व गोष्टी तुम्ही स्थिरस्थावर करू शकाल.
तरुणांना शॉर्टकट घेऊन चालणार नाही. करिअरमध्ये बेसावध राहू नये. विवाह आणि मोठी गुंतवणूक असे निर्णय शक्यतो सप्टेंबरनंतर घ्यावे. कलाकार आणि खेळाडूंच्या कौशल्याची या वर्षी परीक्षा होणार आहे. त्यांनी स्पर्धकांना कमी लेखून चालणार नाही.