मेष राशीच्या जातकांचे 2016 मधील वार्षिक राशिभविष्यफल
वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या राशीचे ग्रहमान संमिश्र आहे. तुमच्या स्वभावाला अनुसरून अनेक गोष्टी नवीन वर्षात तुम्हाला कराव्याशा वाटतील. पण ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणार्या माणसांची आणि वातावरणाची साथ मिळवण्यात बराच वेळ आणि शक्ती खर्च होईल. संपूर्ण वर्षभर 'बचेंगे तो और भी लडेंगे' असा पवित्रा तुम्हाला ठेवावा लागणार आहे. पंचम स्थानातील गुरू तुम्हाला चांगली साथ देईल. या राशीच्या व्यक्तिंवर वर्ष 2016 संमिश्र फळांचा वर्षाव करणार आहे.
पढे वाचा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडेसे तणावात जाणारे आहे. एखादे महत्त्वाचे कार्य जर आधी ठरले असले तर ते शक्यतो डिसेंबर-जानेवारीपर्यंत उरकून घ्या. जानेवारी ते मार्च या दरम्यान एखाद्या नैतिक जबाबदारीची जाणीव होईल. जून-जुलनंतर विचित्र प्रश्नाला सामोरे जावे लागेल. ज्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी आहेत त्यांनी २०१६ सालात काळजी घेणे आवश्यक आहे.
घरगुती जीवनात तणाव येणे शक्य आहे; परंतु, व्यवसायिक आयुष्यात मात्र तुम्हाला यशाची भरपूर फळं चाखायला मिळणार असं दिसतं आहे. इतक्यात भरारी घेऊ नका मेषहो, कारण हे यश थोड्या विलंबाने तुमच्या पदरात पडणार आहे.
आपल्या प्रेम जीवनात काहीही मजेशीर संभवत नाही. काम जीवनात देखील आतुरता आणि आनंद असणार नाही. अनावश्यक वादांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही नेहमीच लहान-सहान गोष्टींवर भडकून उठता, परंतु त्यातून सकारात्मक काही निष्पन्न होत नाही. शेअर बाजारापासून दूर राहा. ऑगस्टनंतर आपल्या जीवनात चांगलं वातावरण राहील, परंतु संपूर्ण वर्षभर दक्ष राहण्याची गरज आहे.
पढे वाचा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने २०१५ सालात वातावरण एकंदरीत समाधानकारक राहील. जानेवारी-फेब्रुवारी महिना तुमचा उत्साह वाढविणारे आहेत. नवीन काम मिळाल्यामुळे तुम्हाला खूप काही तरी करावेसे वाटेल. मार्च महिन्यात सावधतेने पाऊल पुढे टाका. मोठय़ा कामाला सुरुवात करण्यापूर्वी स्वत:ची आíथक मर्यादा आणि बाजारातील परिस्थिती याचा सारासार विचार करा. व्यवसायिकांसाठी, त्यांनी मोठी गुंतवणूक न करणे हे उत्तम. यावर्षी अनावश्यक खर्च करण्याची सवय नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे.
एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीमध्ये काही कारणाने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याला तोंड देण्यासाठी तुमचे हितचिंतक आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुका उपयोगी पडतील. सप्टेंबर ते पुढील दिवाळीपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कराल.
मार्च महिन्यापर्यंत नोकरदार व्यक्तींच्या हातून एखादी चांगली कामगिरी पार पडेल. जादा पगारवाढ किंवा बढती मिळावी असे त्यांना वाटेल, पण अपेक्षेपेक्षा काही तरी कमी मिळाल्यामुळे थोडीशी नाराजी राहील. बेकार व्यक्तींना डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये नोकरी मिळेल. चालू नोकरीमध्ये मार्चपासून सप्टेंबपर्यंतचा काळ खडतर आहे. या दरम्यान वरिष्ठांचे मूड बदलत राहतील. बदली होण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत परिस्थिती थोडीशी निवळेल.
तरुणांना एक प्रकारचा तणाव जूननंतर जाणवेल. त्यांनी नोकरीमध्ये शक्यतो बदल करू नये. कलाकार आणि खेळाडूंना काळानुसार त्यांचे धोरण बदलावे लागेल. महत्त्वाच्या आणि मोठय़ा व्यक्तींशी त्यांनी वादविवाद घालू नये.