चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा हा शालिवाहन शक आणि विक्रम संवत यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय सौरपंचांगाची कालगणना या दिवसापासून सुरू होते. यंदा 8 एप्रिल, शुक्रवारी ही तिथी असल्यामुळे या दिवसापासून हिंदू नवं वर्षाचा शुभारंभ मानला जाईल. या तिथीपासून विक्रम संवत 2073 सुरू होईल, ज्याचे नाव सौम्य आहे. या संवतचा राजा शुक्र व मंत्री बुध आहे. विक्रम संवत 2073 कोणत्या राशीसाठी कसा राहणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील पानावर क्लिक करा-
ऑगस्टपर्यंत गुरुची पूर्ण दृष्टीमुळे जमीन संबंधी प्रश्न सुटतील आणि नवीन स्रोत प्राप्त होतील. विवादांवर विजय मिळवाल. एका वेळेस बरेच काम करण्याचे मन बनेल आणि मित्र व कुटुंबीयाची साथ मिळेल. यानंतर थोडे सावध राहणे गरजेचे आहे.
प्रोफेशन आणि व्यापार- ऑफिसमध्ये एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. पराक्रमात वाढ होईल आणि व्यापारात चांगली मिळकत मिळणार आहे.
शिक्षा- श्रेष्ठ परिणाम आणि श्रेष्ठ विद्यार्थी वर्गाला अभ्यासात मन लावावे लागणार आहे.
आरोग्य - दातांच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो आणि त्वचेसंबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
प्रेम- प्रेम प्रस्ताव कराल आणि वैवाहिक बाधा दूर होईल. वडिलांचा सहयोग मिळेल.
काय करावे - यथाशक्ति धन आणि वस्त्र दान करावे.
शनी आणि मंगळाची दृष्टी या राशीवर पडत आहे. मन विचलित होऊ शकत आणि प्रत्येक बाबींवर चिडचिड होण्याची शक्यता आहे. मंगळाची दृष्टी दूर होताच तुमच्या आत्मविश्वासात कमी येऊ शकते. परिवाराचे लोकं परेशान होऊ शकतात. आपले काम मन लावून करा, दुसरे काय म्हणतात आहे, यावर लक्ष्य देऊ नका. यश नक्कीच मिळेल.
प्रोफेशन आणि व्यापार- वरिष्ठांकडून नाराजी मिळेल आणि कनिष्ठांना देखील तुमच्याकडून समस्या असू शकते.
शिक्षण - अभ्यासासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
आरोग्य - रक्तचाप, गुडघे, पाईल्स, जळजळ आणि ताप इत्यादी समस्या असू शकते.
प्रेम- जोडीदाराकडून निराशा मिळू शकते. विवाह प्रस्ताव मिळतील. वैवाहिक स्थिती उत्तम राहणार आहे.
काय करावे - योग्य व्यक्तीला वस्त्र दान करा.
तुमची राशी वर्षभर मजबूत राहणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल सोबत तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला राहील. जास्त यश मिळाल्याने तुमच्यात अतिआत्मविश्वास देखील येऊ शकतो. यापासून स्वत:चा बचाव करा. पराक्रमात वाढ होईल आणि यश मिळेल. एखादे मोठे कार्य पार पडू शकतात.
प्रोफेशन आणि व्यापार- जुने गुंतवणूक आणि जमिनीकडून लाभ आणि व्यापारात फायदा होईल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे.
शिक्षा- मेहनत सफल होईल, परिणाम सुखद मिळतील आणि अभ्यासात तुमचे मन लागेल.
आरोग्य - महिलांना स्वास्थ्य लाभ मिळेल. जुने रोगांचे अंत होईल आणि मन प्रसन्न राहणार आहे.
प्रेम- संतानाकडून सुख मिळेल. आई वडील आणि जोडीदाराशी संबंध अनुकूल राहतील.
काय करावे - निर्धनानला कच्चे तांदूळ आणि मुगाची डाळ दान करा.
आत्मबल वाढेल पण काळजी जास्त राहणार आहे. जोखिमीचे काम करू नये आणि विवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत व्यय जास्त आणि आवक कमी होण्याची शक्यता आहे. मार्च 2017मध्ये परत सुधारणा दिसेल.
प्रोफेशन आणि व्यापार- कामात अनियमिततेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. सांभाळून कार्य करा. व्यापार मध्यम राहील.
शिक्षा- मेहनतीनंतर देखील अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळणार नाही. एखादा नवीन प्रयोग अपयशी ठरू शकतो.
आरोग्य - ताप व सर्दीचा त्रास होण्याची शक्यता आहे.
प्रेम- जोडीदाराशी भेट होईल, वेळ चांगला जाईल. लग्नात येणार्या अडचणी दूर होतील.
काय करावे - निर्धन बालकाला अभ्यासाची सामग्री जसे - पुस्तक, वही, पेन, पेंसिल इत्यादी दान करा.
गुरु आणि राहूच्या गोचरामुळे मिळकतीत वाढ होण्याची शक्यता आहे, पण शनीची साडेसाती चालू आहे, म्हणून कुठलेही कार्य करण्याअगोदर प्रत्येक गोष्ट विचार करून करा. ऑगस्टनंतर गुरू द्वितीय होईल. राहू तसाच राहणार आहे. ही वेळ थोडी काळजीची आहे.
प्रोफेशन आणि व्यापार- तेल, केमिकल, लोखंड इत्यादींचे काम करणार्या लोकांसाठी वेळ फारच अनुकूल आहे.
शिक्षण - अभ्यासात मन लागणार नाही व इतर गोष्टींकडे तुमचे लक्ष्य जास्त राहणार आहे. परिणाम कमजोर येतील.
आरोग्य - हाताला जखम होऊ शकते. अपचनाचा त्रास होऊ शकतो.
प्रेम- प्रेम संबंधांमध्ये सुधारणा येईल. वैवाहिक जीवन सुखद राहणार आहे.
काय करावे - निर्धनाला धन दान करा.
उच्चच्या शुक्राची दृष्टी तुमच्या राशीवर आहे. वेळ अनुकूल राहील. अडचणी दूर होतील आणि सर्व बाजूने शुभ समाचार मिळतील. पूर्ण वर्षभरात ऑगस्टनंतर कामाची अधिकता राहील आणि भाग्य देखील साथ देईल. आवश्यकता वेळेवर पूर्ण होतील. एखादे नवीन काम मिळू शकत.
प्रोफेशन आणि व्यापार- गुंतवणूक करण्याअगोदर सावधगिरी बाळगा, कोणालाही उधार देऊ नका.
शिक्षा- परिणाम अपेक्षित राहणार नाही. अधिक मेहनत करावी लागणार आहे.
आरोग्य - स्कीन संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागेल. घसरून पडण्याची भिती आहे.
प्रेम- जोडीदारा सोबत थोडे वाद होण्याची शक्यता आहे. लहान सहन गोष्टींवर क्षुब्ध होऊ शकता.
काय करावे - कन्येला वस्त्र इत्यादी दान करा.
चंद्रच्या दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. हे वर्ष प्रत्येक बाबींमध्ये अनुकूल राहील. साडेसातीमुळे काही अडचणी येऊ शकतात. शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. जानेवारीपासून आराम मिळेल. मिळकतीत सुधारणा येईल आणि विवादित प्रकरणात विजय मिळेल.
प्रोफेशन आणि व्यापार- व्यापारिक उपक्रम जास्त राहतील. नोकरीत कामाची अधिकता राहील.
शिक्षा- स्कूल किंवा कॉलेजमध्ये एखादा कडू अनुभव येण्याची शक्यता आहे. स्वत:च्या कामावर अधिक लक्ष्य द्या. स्वास्थ्य- डिप्रेशन, खांदा आणि पायाचे दुखणे राहणार आहे. वीज, पाण्यापासून सावधगिरी बाळगा.
प्रेम- इतर लोक प्रेमात अडचणी आणू शकतात. स्वत:वर भरवसा ठेवा आणि जोडीदारासोबत कम्युनिकेशन बनवून ठेवा.
काय करावे - बेसन आणि जुने वस्त्रांचे दान करा.
मंगळ, शनी गोचर राशीत राहील. ही रास स्वत:च्या ताकदीवर पुढे वाढेल. जानेवारी 2017 नंतर भित्रेपणा जाईल. प्रत्येक सामन्यासाठी तयार राहाल. कोणाच्याही मदतीविना ठामपणे कार्य सिद्ध कराल.
प्रोफेशन व व्यापार- शेती, लोखंड, सोनार, कॉम्प्युटर, खाते, औषधं, सौंदर्य सामग्री अश्या व्यवसायात असणार्यांना उत्तम लाभ.
शिक्षण- उत्तम परिणाम, शाळेतील खेळात यश आणि श्रेष्ठ प्रदर्शन, अभ्यासाची आवड.
आरोग्य- आळस, दात, पोट, डोळे, कानासंबंधी आणि चुटपूट जखम होऊ शकते.
प्रेम- प्रेमात जमेल. पार्टनरसाठी वेळेचा अभाव असू शकतो.
काय करावे- चण्याची डाळ दान करावी.
या राशीवर गुरुची दृष्टी आहे. वेळ अनुकूल आहे. ऑगस्टनंतर गुरुची दृष्टी हटेल, तरी दशम गुरु असल्याने कुटुंबात वर्चस्व वाढेल व कार्यस्थाळावर सुसंगतता राहील. नवीन काम मिळेल. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टकडे वळू शकता. फायनेंस या क्षेत्रात जाण्याची इच्छा जागृत होईल.
प्रोफेशन व व्यापार- सिनेसृष्टी, टीव्ही मालिका, फॅशन, तेल, धान्य व राजकारणी लोकांना फायदा होईल.
शिक्षण- परदेशी शिक्षण घेऊ इच्छित विद्यार्थ्यांना यश मिळेल. अभ्यासात मन रमेल.
आरोग्य- हृदयासंबंधी रोग असलेल्यांना काळजी घेण्याची गरज आहे. ताप व इतर सामान्य रोग होऊ शकतात.
प्रेम- प्रेमात निराशा हाती लागेल. दांपत्य जीवनातील ताण संपेल आणि सुख लाभेल.
काय करावे- गरिबांना अन्न दान करावे.
राशी स्वामी शनीची पूर्ण तृतीय दृष्टी आपल्या राशीवर आहे. जानेवारी पर्यंत हीच स्थिती राहील. आर्थिक स्थिती खालवेल पण आत्मबल मजबूत राहील. सन्मान मिळेल. भविष्याप्रती आशा जागृत होईल. मुलांसोबत वेळ घालवता येईल. डिसेंबरपासून आर्थिक स्थिती सुधरेल.
प्रोफेशन व व्यापार- विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत अधिकारी प्रसन्न राहतील.
शिक्षण-अतिरिक्त भार येऊ शकतं. परीक्षेच्या तयारीत विघ्न येणार नाही.
आरोग्य- वायू विकार होण्याची शक्यता आहे. शरीरात कमजोरी आणि पित्ताची तक्रार उद्भवू शकते.
प्रेम- प्रेमात ताण वाटू शकतो. अपत्याकडून स्नेह मिळेल, वडील अनुकूल राहतील. दांपत्य जीवन सुखी राहील.
काय करावे- खिचडी आणि गरिबांना वस्त्र दान करावे.
चंद्रमा योग्य जागेवर आहे. सर्व कार्य सुरळीत पार पडतील व कोणत्याही प्रकाराचा अडथळा येण्याची शक्यता नगण्य आहे. अधिकारी अनुकूल राहतील आणि व्यर्थ कामात वेळ वाया जाणार नाही. आर्थिक स्थिती मजबूत राहील. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल.
प्रोफेशन व व्यापार- आत्मविश्वास यश मिळवून देईल. गुंतवणूक फायदेशीर आणि व्यावसायिक स्थिती अनुकूल राहील.
शिक्षण- अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धेत श्रेष्ठ परिणाम हाती येतील.
आरोग्य- केस गळणे आणि डोळ्यांसंबंधी तक्रार असू शकते. मूत्र विकार होण्याची शक्यता आहे.
प्रेम- पार्टनरसोबतचे वाद निवतील आणि गिफ्ट मिळेल. दांपत्य जीवनात सुख येईल.
काय करावे- पिवळे वस्त्र दान करावे.
या वर्षी उच्चच्या शुक्रच्या गोचर असूनही राशी कमजोर असल्याचे संकेत आहे. निर्धारित लक्ष्य प्राप्तीसाठी अडचण येईल आणि कठीण कसोटीला समोरा जावं लागेल. कौटुंबिक सहयोग मिळेल. वर्षाच्या शेवटी हात आवरता घ्यावा लागू शकतो.
प्रोफेशन व व्यापार- ऑफिसमध्ये समस्या आढळू शकतात. उत्पन्नाचे स्त्रोतात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
शिक्षण- अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकतं आणि अनुपस्थितीची अधिक शक्यता आहे.
आरोग्य- पोटातील विकार होण्याची शक्यता आहे. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, निष्काळजीपणा नुकसान करेल.
प्रेम- लग्न ठरण्याचे योग आहे. प्रेमात स्थिरता येईल.
काय करावे- ब्राह्मणाला जानवे, आसन आणि गीता दान करावे.