Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साप्ताहिक राशी भविष्य 6 ते 12 मार्च 2016

वेबदुनिया

मेष : व्यापारधंद्यात काही बेत रद्द झाल्यामुळे किंवा लांबल्यामुळे गैरसोय. खर्चात वाढ. मार्चनंतर नवीन कामे मिळण्याची शक्यता. मे नंतर प्रगतीचा वेग वाढेल. काही कर्ज फेडू शकाला. ज्यादा भांडवल उपलब्ध होईल. यश मिळवण्यासाठी संघर्ष आवश्यक.

 


webdunia
WD

वृषभ : जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्क्तीसाबतच्या तुमच्या खाजगी ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. धंदयात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा.


webdunia
WD

मिथुन : वातावरण आपल्या तब्येतीसाठी ठीक नाही. पोटासंबंधीच्या विकारांपासून वाचण्यासाठी बाहेरचे खाणे टाळा. शेजाऱ्यांशी भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. यासाठी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल.


webdunia
WD

कर्क : नवीन जागा, वाहन खरेदी शक्य. पण नाकापेक्षा मोती जड होऊ देऊ नका. जून-जुलैनंतर मुलांचे उपद्‍व्यापल शिक्षणामुळे होणारे खर्च आणि वृद्ध व्यक्ती यासाठी खर्च. कलाकार-खेळाडू जनूपर्यंत चांगली कामगिरी करून नाव कमावतील.


webdunia
WD

सिंह : मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा आठवडा आपल्याला शुभ फ़ळ देणार नाही.


webdunia
WD

कन्या : सर्व प्रयत्नांतीही काम होईलसे दिसणार नाही, मेहनतीच्या तुलनेत फळ मिळणार नाही. जोडीदाराशी आपले वागणे ठीक राहणार नाही. आई-वडिलांच्या प्रसन्नतेची पूर्ण काळजी घ्या. अपत्यांकडूनही चांगली बातमी समजणार नाही. शत्रू हावी राहतील. मन अशांत राहील.


webdunia
WD

तूळ : अडलेली कामे होतील. खूप दिवसांपासून तुम्ही बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवत आहात, तो पूर्ण होईल. कोणीतरी तुमच्यावर खोटा आरोप लावण्याची संधी शोधत आहे. सावधान राहा. अधिकारी लोकांशी चांगले संबंध राहतील, जे तुम्हाला दीर्घकालीन लाभ देतील.


webdunia
WD

वृश्चिक : धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रांसपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा. प्रतिष्ठीत व्यक्तीकडून लाभ होतील. परप्रांताशी आपले व्यावसायीक संबंध सुधारतील. व्यवसाय उद्योगात आपणास विरोध करणार्‍या व्यक्तींकडून लाभ होतील. मेहनतीचे चीज झाल्याने समाधान लाभेल.


webdunia
WD

धनु : गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. व्यापारी वर्गासाठी अनुकूल वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. अनुकूल वेळ आहे. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील.


webdunia
WD

मकर : कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव तर असेल, पण ईश्वर- नामस्मरणाने शांती मिळेल. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. अनावश्यक प्रवास टाळावेत. घरातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता राहील.


webdunia
WD

कुंभ : प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दया, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. पण व्यवस्थित समजवल्याने त्यांची नाराजी दूर होऊ शकते. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा.


webdunia

WD
मीन : सोन्याच्या खरेदीने भविष्यात फायदा होईल. आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्मिक वेळ आहे. लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील. भागीदारी व्यवसायातून जबाबदारीची कामे स्विकारावी लागतील.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi