Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साप्ताहिक राशीफल 12 ते 18 मार्च 2017

साप्ताहिक राशीफल 12 ते 18 मार्च  2017
, शनिवार, 11 मार्च 2017 (17:26 IST)
मेष : व्यवसायात आर्थिक  स्थिती उत्तम राहील. मित्र, जोडीदार आणि भागीदाराकडून लाभमिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन कार्य हातात घेण्याअगोदर त्या संदर्भात निष्पक्षपणे विचार करा. 12 तारखेला व्यावसायिक बांधणीवर धनखर्च होण्याची शक्यता आहे. या वेळेस तुमच्यासोबत विश्वासघात होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही परेशान व्हाल. गणेशजींचा सल्ला आहे की या आठवड्यात तुम्ही दुसर्‍यांच्या भरवस्यावर न बसता काही महत्त्वपूर्ण कामस्वत:च्या जबाबदारीने करा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल.उधारीत अडकलेले पैसे परत मिळवण्यास तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
 
वृषभ : घरात सुख सुविधांच्या वस्तूंमध्ये वाढ होईल. या वेळेस जोडीदाराच्या नावाने दीर्घकालीन गुंतवणूक लाभ देईल. नोकरी करणार्‍या लोकांना पागारात वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या कार्यांबाबत तुम्ही परदेशात जाऊ शकता किंवा दूरच्या पल्ल्याचा प्रवास घडण्याचीशक्यता आहे. 13 आणि 14 तारखेदरम्यान देवाण घेवाणमध्ये चुका झाल्याने आर्थिक झटका लागण्याची शक्यता आहे. या वेळेस तुम्हाला आकस्मिक खर्च येऊ शकतात, म्हणून आधीपासून त्याची तयारी ठेवा. 15 तारखेला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी राहील. सख्खेनातेवाईक आणि भाऊ बहिणींच्या संबंधांमध्ये सुधार दिसून येईल. जे लोक सरकारी नोकरी करत आहे, त्यांची बदली मनासारख्या जागेवर होण्याची शक्यता आहे.
 
मिथुन : या आठवड्यात तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे पण तुम्ही केलेल्या प्रयत्नांना अद्याप यश मिळणार नाही. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही प्रत्येक कार्य फारच घाईघाईने कराल. पण, गणेशजींचा तुम्हाला असा सल्ला आहे की तुम्ही वाहन थोडे जपून चालवा. आठवड्यात तुम्हाला लहान सहानं ऑपरेशन करावे लागणार आहे. उद्योगाच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल आहे. या वेळेस व्यवसाय विस्तार संबंधी योजना यशस्वीपूर्वक पार पाडाल. लोन किंवा एखाद्याला उधार दिलेले पैसे वेळेवर परत येतील.
 
कर्क : या आठवड्यात तुम्हाला फक्त तुमच्या प्रतिस्पर्धांशी सावध राहण्याची गरज आहे कारण तुमचे विरोधी तुम्हाला खाली दाखवण्याच्या प्रयत्नात असतील. घरात पाहुण्यांचे येणे जाणे सुरू राहील. भाऊ बहिणींशी तुमचे संबंध आधीपेक्षा जास्त सुमधुर होतील. जर संबंधांमध्ये आधीपासून मतभेद सुरू असतील तर या आठवड्यात ते सर्व संपुष्टात येतील. तुम्हाला सामाजिक समारंभात जाण्याचे योग येतील. त्यामुळे तुमची ओळख अधिक वाढेल. या आठवड्यात कमी किंवा जास्त प्रमाणात  तुमचा प्रवासाचा योग येत असून तुम्ही धार्मिक स्थळाची यात्राही करू शकता. 
 
सिंह : या आठवड्यात कौटुंबिक प्रकरणांमध्ये तुम्ही अडकू शकता. तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखून ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. संपत्ती किंवा पारिवारिक संपत्तीचे प्रकरण न्यायालयात पोहचण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याप्रमाणे  तुम्ही तुमचा व्यवसायात प्रगती कराल. पण गणेशजींचातुम्हाला सल्ला आहे की तुम्ही तुमच्या व्यवसायाचे विस्तृतीकरण किंवा नवीन उद्यम सुरू करण्यासाठी सध्या गुंतवणूक करू नका. बाजारात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे तुम्ही पूर्ण आठवडा अस्वास्थ्य राहाल.
 
कन्या : नवीन जागा, इंडस्ट्रियल पार्क, रिअल एस्टेट, संयंत्रासाठी शेड किंवा नवीन दुकानासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. विवाहासाठी उत्सुक असणार्‍याजातकांसाठी हा वेळ अनुकूल आहे. या आठवड्यात तुम्हाला नवीन स्थळ येण्याची शक्यता आहे. लग्नाची गोष्ट पुढे जाऊ शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या  स्पर्धकांवर विजय मिळवाल. या आठवड्यात तुम्हाला भरपूर काम असले तरी त्यातून वेळ काढून तुम्ही कुटुंबीयांसोबत एखाद्या सुंदर जागेवर फिरायला जाऊ शकता ज्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. 
 
तूळ : या आठवड्यात काही आकस्मिक घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्याकुलतेमुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे लक्ष देऊ शकणार नाही त्याचा प्रभाव म्हणून तुमचा टर्नओवर प्रभावित होऊ शकतो. लोन किंवा उधार दिलेले रुपये परत मिळू शकतात. स्थायी संपतीच्या खरेदीमुळे चांगला फायदा मिळणार आहे. या  आठवड्यात आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 13 आणि 14 तारखेला पोट आणि डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे अथवा अपघात होऊ शकतो.
 
वृश्चिक : कार्याच्या व्यस्ततेत तुम्ही थोडा वेळ काढून तुमच्या  कुटुंबीयांसोबत फिरण्यात वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही स्वतःला फ्रेश अनुभवाल. घरासाठी एखादी नवीन वस्तूची खरेदी कराल. घराची दुरुस्ती करून घरातील सामानांना वास्तूनुसार जमवाल. शेअर बाजार, कमिशन, ब्रोकर सारख्या कार्यांशी निगडित लोकांना त्याचे उत्तम फळ मिळू शकतात. स्थायी मालमत्तेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. तुम्ही या आठवड्यात वाहन खरेदीचा विचार करू शकता. तुम्ही आध्यात्मिक उपक्रमात जास्त लक्ष्य घालाल.
 
धनू : तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अन्यथा तुमच्या संबंधांत दुरावा येऊ शकतो. यंदा मिळकतीपेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. या वेळेस तुम्हाला तुमच्या बचतीहून पैसा काढावा लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त खर्च करण्यास टाळायला पाहिजे. या आठवड्यात कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नका, अन्यथा तुम्हाला मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. 
 
मकर : बर्‍याच दिवसांपासून अडकलेले न्यायालयीन खटल्याचे या आठवड्यात सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याने तुम्हाला थोडा आराम मिळेल. व्यवसायात तुम्हाला लेबर वर्गाकडून बरीच मदत मिळणार आहे आणि तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण करण्यात यश मिळवाल. भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध उत्तम राहतील. कुटुंबात एखादा प्रश्न समोर आला असेल तर त्याचे समाधान नक्कीच मिळेल. टूर, ट्रॅव्हल्स, होटल, रेस्टोरेंट, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, ग्राफिक्स,आर्किटेक्ट्स क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. 
 
कुंभ : नोकरी आणि व्यवसायात तणाव आल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. कार्य स्थळावर तुम्हाला स्पर्धेत टिकून राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही स्थायी मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर सध्या त्याचा विचार करणे सोडून दिलेलेच उत्तम आहे. भाड्याने करत असलेल्या  कामावर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. शेयर बाजार आणि ट्रेडिंगच्या कामात सध्या नवीन साहस करू नये. जर आधीपासून कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यात कमी फायदा मिळाला असेल तरी त्यातून लगेचच बाहेर निघा.
 
मीन : या आठवड्यात तुम्ही  रोमँटिक मूडमध्ये राहणार आहे. तुमच्यात ऊर्जा आणि स्फूर्ती  अधिक असेल. त्यासोबतच भौतिक आकर्षणदेखील अधिक राहणार आहे. महिला जातक या आठवड्यात सौंदर्य प्रसाधन, ब्युटीट्रीटमेंट, वस्त्र,  दागिने इत्यादींच्या खरेदीत पैसा खर्च करणार आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळतील पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे सहजपणे काहीही मिळू शकत नाही. आठवड्याच्या शेवटी तुमचे सर्व लक्ष्य कौटुंबिक बाबींवर राहणार आहे. 14 तारखेला  न्यायालयीन प्रकरणात धन खर्च करावे लागणार आहे. विद्यार्थी आणि सरकारी किंवा आंतरिक प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या लोकांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शनिवारी जोडे चपला चोरी जाणे उत्तम असते