rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तूळ राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Astrology 2017
तूळ राशी असणारे जातक साडेसातीच्या अंतिम आहात. फेब्रुवारी महिन्यात साडेसाती संपणार या अपेक्षेने तुम्ही आनंदी असाल, पण गुरुचे भ्रमण तुम्हाला विशेष चांगले नाही. कारण गुरू बाराव्या स्थानात भ्रमण करणार आहे. बाहेरून जेवढ्या गोष्टी सोप्या वाटतात, तेवढ्या त्या असणार नाही. त्या साध्यच करण्याकरिता तुम्हाला सरहद्दीवरच्या जवानाप्रमाणे सतर्क राहावे लागेल. आयुष्यातल्या सुखाच्या प्रवासात जेव्हा दया, प्रेम सहानुभूती व कृतज्ञता या सद्गुणांचा सहवास होतो तेव्हा पायाखालच्या पायरीचेही महत्त्व कळून येते. असाच काहीसा वेगळा अनुभव आपल्याला येईल. शनी आणि मंगळ हे दोन ग्रह तुम्हाला साथ देतील. यशाची किंमत कळेल. 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी.... व्यापार आणि उद्योगात स्पर्धेला तोंड देण्यासाठी बरेच प्रवास करावे लागतील. व्यापार-उद्योगात फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी थोडासा खडतर आहे. जे काम आपण हातामध्ये घेतले आहे ते पूर्ण करू शकाल का, याची तुमच्या मनामध्ये शंका असेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिने आर्थिकदृष्ट्या समाधानकारक जातील. फेब्रुवारी ते सप्टेंबर हा कालावधी विशेष अनुकूल आहे. या दरम्यान तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करू शकाल. जून ते ऑगस्ट या दरम्यान चांगला फायदा होईल. पूर्वीची बरीचशी कर्जे तुम्ही आटोक्यात आणू शकाल. जुलैनंतर ज्या घडामोडी घडतील त्यातून एका झंझावाती पर्वाची सुरुवात होईल. प्रत्येक आघाडीवर सतर्क राहावे लागेल. नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षात बरीच आव्हाने स्वीकारून प्रगती करावी लागेल. सुरुवातीला त्यांना त्याची भीती वाटेल, पण नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल. त्यामुळे आर्थिक आणि इतर फायदे मिळतील. बदली हवी असेल तर मार्च-एप्रिलच्या सुमारास प्रयत्न करा. प्रयत्क्ष आनंद सप्टेंबर 2017 नंतर मिळेल व परदेशी जाण्याचे स्वप्न येत्या वर्षांत पूर्ण होईल.
गृहसौख्य व आरोग्यमान... 
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने वर्ष साधारण आहे. अपेक्षित आणि अनपेक्षित खर्च वाढल्याने तुमच्यावर एक प्रकारचा दबाव राहील. भागीदाराच्या प्रगतीविषयी जून-जुलैनंतर चिंता राहील. फेब्रुवारीपर्यंत शनी धनस्थानात राहील. तो तुमचा तणाव वाढवणारा आहे. कुटुंबातील व्यक्तींची तुम्हाला काळजी वाटेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता पैसे उभे करावे लागतील. फेब्रुवारीनंतर तुमचा तणाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. एकेक उद्दिष्ट पार पडल्यावर तुम्ही शांत व्हाल. नवीन घराचा विचार त्या वेळेला तुम्ही करू शकता. जुनी प्रॉपर्टी विकली जाईल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना वर्ष संस्मरणीय ठरेल. तरुणांना येत्या वर्षांत बऱ्याच कष्टानंतर स्थिरता लाभेल. पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण येईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशासाठी बरेच कष्ट पडतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कन्या राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल