rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मीन राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Astrology 2017
मीन राश्याधिपती गुरुचे सप्तमस्थानातील भ्रमण येत्या वर्षात तुम्हाला अनुकूल आहे. दबून राहिलेल्या अनेक इच्छा आकांक्षांना योग्य संधी मिळाल्याने तुमच्यातील जोम-उत्साह आणि महत्त्वाकांक्षा जागृत होईल, त्या जोरावर बरेच काही करू शकाल. एखादे मोठे ध्येय तुम्ही पूर्ण करू शकाल. संपूर्ण वर्ष मंगळसुद्धा तुम्हाला एक प्रकारची नवीन ऊर्जा देणार आहे. आता मागे वळून बघायची गरज नाही. व्यापार-उद्योगात ज्या अडचणींचा सामना तुम्ही सप्टेंबरपर्यंत केला होता, त्या संपत आल्यामुळे तुम्ही चांगले काम करू शकाल. मार्च-एप्रिलमध्ये चांगले पैसे मिळतील. एप्रिल-मेच्या सुमारास एखादी छोटीशी परदेशवारीसुद्धा करावी लागेल. कारखानदार मंडळी विस्ताराच्या योजना हाती घेतील. 
धंदा, व्यवसाय व नोकरी...
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी....नवीन भागीदारी किंवा कराराचे प्रस्ताव कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. एकंदरीत वर्ष चांगले आहे. नोकरदार व्यक्तींना बऱ्याच काळानंतर त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. नोव्हेंबर-डिसेंबरामध्ये चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. मे-जून या महिन्यात बदली किंवा कामाच्या स्वरूपातील बदल होण्याची शक्यता आहे. येत्या वर्षांकरिता तुमची निवड होईल. जादा अधिकार मिळाल्यामुळे कामाचा तणाव वाढेल. नोकरदार व्यक्तींना वर्ष उत्तम आहे. जितके काम जास्त तितका फायदा जास्त, असेच 
एकंदरीत चित्र असेल. पूर्वीच्या कष्टाचे चीज होईल. नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळण्यासाठी विशेष शिक्षण जानेवारी ते मे -जून 2017 यादरम्यान घ्यावे लागेल. त्याचा फायदा जुलैनंतर मिळेल. देशात किंवा परदेशात नोकरी मिळविण्यासाठी एप्रिलनंतर प्रयत्न करा. कामात बढती जरी मिळाली नाही तरी आर्थिक फायदा आणि कामातील समाधान बरेच असेल.
गृहसौख्य व आरोग्यमान.. 
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान.. घरामध्ये आनंददायी प्रसंगाची नोंद एप्रिल ते जुलै या दरम्यान होईल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील, तरुणांना स्थिरता येईल. त्यांचे विवाहाचे बेत सप्टेंबर 2017 पूर्वी सफल होतील. गृहसौख्याच्या दृष्टीने वर्ष सौख्यकारक ठरेल. पूर्वी ठरविलेली कार्ये   काही कारणाने लांबली असतील, तर त्याला मुहूर्त लाभेल. नवीन जागेमध्ये प्रवेश करण्याचे योग जानेवारी किंवा जुलैमध्ये संभवतो. कुटुंबीयांसमवेत लांबच्या प्रवासाचे योग एप्रिलच्या सुमारास आहेत. एखाद्या आवडत्या व्यक्तीची काही काळजी वाटत असेल, तर ती बऱ्याच 
प्रमाणात कमी होईल. लांबच्या नातेवाइकांना भेटण्याचा योग येईल. तरुण मंडळींना ग्रहांची उत्तम साथ आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती करता येईल आणि वैवाहिक जीवनात पदार्पण होईल. महिलांचे दीर्घकाळचे स्वप्न साकार होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठी मजल मारता येईल. कलाकार, खेळाडू आणि सामूहिक क्षेत्रातील व्यक्तींना येत्या वर्षात नेहमीपेक्षा जास्त प्रसिद्धी आणि धनलाभ होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुंभ राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल