Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑक्टोबर 2017चे मासिक भविष्यफल

ऑक्टोबर 2017चे मासिक भविष्यफल
, शनिवार, 30 सप्टेंबर 2017 (14:21 IST)
मेष : प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दया, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. पण व्यवस्थित समजवल्याने त्यांची नाराजी दूर होऊ शकते. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते. 

वृषभ : तुमचे शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात. नव्या जबाबदाया मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल. 

मिथुन : भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. 
 
कर्क : महिना साधारण आहे. स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा. 

सिंह : जुनी थांबलेली कामे मार्गी लागतील. कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका तुम्हाला इच्छेनुसार फळ मिळेल. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होईल. विरोधक शांत राहतील. जोडीदार प्रसन्न आणि अपत्य संतुष्ट राहतील. एकुणच तुमच्यासाठी हा चांगला महिना आहे. कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. यासाठी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. 

कन्या : या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा. 

तूळ : तुमच्या जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल. 

वृश्चिक : तुम्ही चिंतित राहाल. शत्रू पक्ष तुमच्यावर हावी होऊ शकतो. भौतिक साधनांवर निरर्थक पैसे खर्च होण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. 

धनु : सर्व काही ठीक चालले आहे. लहानमोठया समस्या सोडल्या तर हा महिना उत्तम चालला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवे वाहन किंवा घर वगैरे खरेदी करु शकता. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल.  

मकर : काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल. कुटुंबीय एका मजबूत भिंतीसारखे तुमच्यासोबत ठामपणे उभे राहतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. 

कुंभ : हा महिना कडू-गोड अनुभवांचा असेल. महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. दीर्घ यात्रा फायदेशीर तर असतील पण यासाठी अधिक पैसेही खर्चावे लागतील. शत्रू आपल्याला त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही. महिन्याच्या पूर्वार्धात खर्च अधिक होईल, ज्यामुळे धन संचयात अडचण निर्माण होईल. चांदीच्या तांब्यात वाहत्या नदीचे पाणी भरून ठेवल्यास फायदा होईल. 

मीन : या महिन्यात सावध राहणे फारच गरजेचे आहे, कोणीतरी आपल्याविरुध्द कट रचत आहे. हलकीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. एका मांगलिक कार्याचा योग जुळत आहे. सकारात्मक वातावरण कायम राहील. फार मेहनत करावी लागेल. हो, त्यानुसार फळही मिळेल. इच्छीत लाभाने आनंद होईल. स्पर्धेचा निकाल आपल्याला प्रसन्न करेल. स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वजन वाढेल. नोकरीत पदोन्नती शक्य आहे. तब्येतही थोडी नाजुक राहील. विद्यार्थी वर्गासाठी चांगली बातमी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साप्ताहिक भविष्यफल 1 ते 7 ऑक्टोबर 2017