Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्ष कल्याणकारी असो : उपाय 2018

नवीन वर्ष कल्याणकारी असो : उपाय 2018
राशी, लग्न, हस्तरेषेद्वारे बरेच उपाय सांगण्यात येतात. पण काही उपाय असे आहे ज्याला प्रत्येक व्यक्ती करू शकतो आणि त्याचा फायदा देखील घेऊ शकतो.   
 
1. सूर्याला अर्घ्य द्या. सूर्याला अर्घ्य देण्याचा वेळ सूर्योदयापासून 15 मिनिटापर्यंतच असतो. नंतर दिलेल्या अर्घ्याचे तेवढे महत्त्व नसत. पाण्यात कुंकू व लाल फूल मिसळायला पाहिजे. अर्घ्य दिलेले पाणी पायात नाही यायला पाहिजे आणि ते चढवताना 'ॐ ह्रीं सूर्याय नम:' 21 वेळा म्हणावे. याने सौभाग्य, आरोग्य, धन धान्यात वाढ होते तथा सन्मान मिळतो.   
 
2. घरात जेथे मुंग्या दिसतात तेथे भाजलेली कणीक, तूप व साखर घालून सकाळी ठेवावी. यामुळे रोजगार मिळतो आणि पाप दूर होतात.
  
3. आमावस्याच्या दिवशी संध्याकाळी खोबर्‍याची वाटी घेऊन त्यात भाजलेली कणीक, साखर, पंचमेवा वाटून भरून द्यावा व त्याचे तोंड बंद करून त्याला काळ्या कपड्यात गुंडाळून पिंपळाच्या झाडाखाली ठेवावे. असे केल्याने 1,000 ब्राह्मणांना भोजन करवण्या इतके पुण्य मिळतात व शनीची कृपा सदैव तुमच्यावर राहते.   
 
4. पिंपळाला जल चढवणे, तूप किंवा तेलाचा दिवा लावून परिक्रमा करणे. तेलाचा दिवा आणि गोड जल चढवल्यामुळे पितृ शांती मिळते. तुपाचा दिवा देवशांति करवतो आणि 11,000 परिक्रमा पूर्ण झाल्याबरोबर तुमची 1 इच्छा पूर्ण होऊन जाते. पिंपळात सर्व देवांचा वास असतो. पिंपळाच्या खाली दुपारी जाऊ नये.    
 
5. मोठ्याचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे कार्यांमध्ये येणारी अडचण दूर होते आणि गुरू ग्रहाची कृपा मिळते. मनुष्य दीर्घायू होतो.   
 
6. गायीला पोळी चारावी. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो. गाय देशी असावी आणि पोळीवर तूप साखर लागलेले असावे, लक्षात ठेवा.   
 
7. कुत्र्याला तेल लावलेली पोळी द्यावी. यामुळे राहू-केतू-शनीची कृपा कायम राहते. कालसर्प दोष असल्यास त्याची शांती करावी.   
 
8. झाड लावावे आणि त्यांचे रोपण करावे. यामुळे बुध देवता प्रसन्न होतात आणि बर्‍याच दोषांपासून मुक्ती मिळते.   
 
9. कन्या भोजन, सुवासिनी भोजन. यांचे भोजन पूजन केल्याने सर्व देवांची कृपा मिळते व शुक्र देवता प्रसन्न होतात. धन-ऐश्वर्य मिळत.   
 
10. असहाय, निर्धन, अपंग तथा गरीब विद्यार्थी ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी, यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतात.   
 
11. कोणाला अपशब्द बोलू नये, कुठल्याही जनावराला त्रास देऊ नये, झाडाला कापू नये, पाण्याचा दुरुपयोग करू नये, कोणाबरोबर छल कपट करू नये. मद्य मांसाचे सेवन करू नये. कुटुंबात कोणाचाही अपमान करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2018 मध्ये सावध राहा.... या राशींवर पडणार शनीचा प्रभाव