Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वृश्चिक राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Scorpio yearly rashifal
वृश्चिक राशीच्या जातकांना 2018 या वर्षात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी तयार असाल तर तुम्ही तुम्हाला यशःप्राप्ती होईल. वर्षभर राशीच्या व्ययस्थानात राहणारा गुरू आणि धनस्थानात असणारा शनी येत्या वर्षात तुमच्या संयमाची परीक्षा बघणार आहे. पण या दरम्यान राश्याधिपती मंगळ बराच काळ तृतीयस्थानात भ्रमण करत असल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे नैतिक धैर्य लाभेल. जरी तुमच्यापुढे प्रश्न आले तरी त्यातून तुम्ही मार्ग काढू शकाल. साडेसातीच्या मधला आणि कठीण भाग आता संपला आहे. तुम्ही फार मोठ्या आशेने आणि उत्साहाने नवीन वर्षात वाटचाल कराल तर तुम्हाला वरचेवर ठेचकाळावे लागेल. तुमचे अनेक ताणतणाव कमी होतील व गमावलेला आत्मविश्वासही तुम्ही हळूहळू मिळू शकाल. 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी....
तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. आर्थिक बाबींचा विचार करायचा झाल्यास, या वर्षभरात, विशेषतः ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक खर्च कराल, त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. व्यापार उद्योगात तुमची परिस्थिती दगडापेक्षा वीट मऊ अशी असणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जर काही कर्ज झाले असेल तर आता त्याची परतफेड हळूहळू करता येईल. मार्च महिन्यात तुम्हाला चांगले पैसे मिळतील. एप्रिल आणि मेचा काही भाग थोडासा खडतर जाईल. मे महिन्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग मिळेल. ऑक्टोबरनंतर चांगले परिणाम दिसू लागतील. गुंतवणूक करण्याआधी नीट खात्री करून घ्या. या वर्षात अधिक कष्ट करण्यासाठी तयार राहा आणि तुमच्या या मेहनतीमुळे तुम्ही अधिक उत्पन्न कमावू शकाल. कामानिमित्त परदेशी जाण्याची एखादी संधी जुलै, ऑगस्ट चालून येईल. नवीन नोकरी असणार्‍यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... 
जानेवारी ते मार्च या कालावधीत आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील, त्यानंतर तुमची प्रकृती ठणठणीत होईल आणि तुम्ही निरोगी व्हाल. नैतिक जबाबदार्‍या पूर्ण करण्याकरिता पैशाची उभारणी करावी लागेल. नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना तुमच्या आर्थिक कुवतीचा विचार करा. मुलांच्या प्रगतीकरिता आणि स्थैर्याकरिता विशेष प्रगती करणे भाग पडेल. पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही ज्यांना शिक्षण घेण्यासाठी परदेशी जायचे आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. मुले आयुष्याचा आनंद उपभोगतील आणि अधिक खोडकर होतील. त्यांच्या एकाग्रतेच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. घरातील वातावरण स्नेहपूर्ण राहील. वैवाहिक आयुष्यही सुखकर राहील. तुमच्या सर्व प्रयत्नांना तुमच्या जोडीदाराकडून साथ मिळेल आणि सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी अनेक आव्हाने असतील, पण तुम्ही प्रगतिपथावर जाऊ शकाल. एकूण या वर्षात संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना यशासाठी निकराची झुंज द्यावी लागेल. त्यांनी स्पर्धकांना कमी लेखू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनू राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल